अकोला शहरात सहकार विभागाचे धाडसत्र
अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले
शहरात एकाचवेळी अवैध सावकारांवर संयुक्तिक कारवाई
अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात व पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरात व जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात धाडसत्र राबवून कारवाई सुरू करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विशेष बाब म्हणजे सहकार विभागाच्या बारा पथकासह या कारवाईला आज सकाळी पाच वाजता पासून सुरुवात झाली शहरातील गोरक्षण रोड सिंधी कॅम्प व जय हिंद चौकात सकाळी कारवाईला सुरू होताच एकच धावपळ उडाली शहरासह इतर बारा ठिकाणी एकाच वेळी संयुक्त कारवाईला सुरुवात करण्यात आली.वृत्तलीहेस्तोवर ही कारवाई सुरू होती .
यामध्ये किती अवैध सावकार विरुद्ध कारवाई करण्यात आली या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी लवकरच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फे माहिती देणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे मात्र अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत