रमाबाई जयंती साजरी!
बाबा साहेब भीमराव आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब दलित कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात जन्मलेल्या रमाबाई आंबेडकर यांना रमाई किंवा माता रमा म्हणूनही ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर रमाबाईंचा खूप प्रभाव होता. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी खूप मदत केली. त्यांनी सामाजिक न्याय आणि सुधारणांसाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांनाही पाठिंबा दिला. रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती भांडारज बू लां अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी संदेश करवते ,रामराव सुरवाडे, बौध्याचार्य प्रशिक इंगळे, किशोर सुरवाडे, यश करवते, भंडारज बु. ची गावकरी मंडळी उपसथित होती