भाजपा पातूर तालुका व शहर मध्ये घर चलो अभियान प्रवासी संयोजकांसाठी प्रशिक्षण सिबीराचे आयोजन
पातूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अपेक्षित श्रेणी मा. जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, मंडळ मोर्चा अध्यक्ष, व सेल संयोजक, न.प नगरसेवक, जि.प/पं.स सदस्य ,वारीअर्स, ग्राम संयोजक ( बुथ प्रमुख) , यांची बैठक घेण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजपर्यंत झालेल्या कामांची माहिती देण्यात आली अनेक योजनांचा लाभ असो की देशाचा विकास दर, त्यानंतर शेतकरी यांच्या योजना, पंतप्रधान आवास योजना , महिला बचत गटांसाठी देण्यात आलेल्या कर्ज योजना , जनधन योजनेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब नागरीकांना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना बँकेचे खाते काढून केंद्र सरकारने केलेल्या कामाची महाराष्ट्र राज्य पातळीवर घर चलो मंडल अभियान प्रवासी संयोजकांसाठी प्रशिक्षण सिबीराचे आयोजन करण्यात आले या सिबीराचे प्रशिक्षक म्हणून अकोला जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे, तसेच प्रमुख उपस्थित म्हणून भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष किशोर मांगते पाटील,व बाळापूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा उपाध्यक्ष रमण जैन, तालुकाध्यक्ष भिका धोत्रे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ वैशाली निकम, सौ वर्षा बगाडे, सौ तुळजाबाई गाडगे, सौ शीला आवटे, सौ प्रिया कोथळकर, तालुक्यातील सर्व निवासी संयोजक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा