पातूर पोलीसांचे शहरात भव्य पथसंचलन

पातूर पोलीसांचे शहरात भव्य पथसंचलन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका सन उत्सवानिमित्त कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पातुर शहरात पोलीस पथसंचलन करण्यात आले.
7 फेब्रुवारी 2024 ला पातुर पोलिसांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशान्वये पातुर शहरातील मुख्य रस्त्यावर पथसंचलन करण्यात आले आहे यावेळी प्रामुख्याने बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्या उपस्थितीत 107 बटालियन आर एफ एस चे मुख्य हीनोतीया रायसेन मध्यप्रदेश कमांडर जगदीश प्रसाद बलाई तथा सहाय्यक मंडळ अमन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आर ए एफ चे दोन राजपत्रित अधिकारी आणि अधिकारी 8, 41,व 51 जवांनान सह दंगा नियंत्रण पथक व पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, तथा वीस पोलीस अमलदार बाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुंमळे अधिकारी एक नाव पोलीस अंमलदार चांन्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण पोलीस मुख्यालय अकोला येथील 32 पोलीस अमलदार यांनी पातुर शहरातील मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन ते मुजावर पुरा शहा बाबू दगाऀ ,शनिवार पुरा, गुजरी लाईन, गणेश विसर्जन मार्ग चिरा चौक, बाळापुर रोड जुने बस स्थानक या मुख्य मार्गाने पातुर पोलीस यांनी पतसंचलन केले व यावेळी दंगा नियंत्रण पथकासह, जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन चे ठाणेदार तसेच पोलीसांच्या उपस्थितीत पोलीस विभागातील वाहने दिसत होती पोलीस प्रशासनाने काढलेल्या पतसंंचलनाने पातुर शहरातील सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते.

किरण कुमार निमकंडे पातुर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news