पालकमंत्र्यांच्या हस्ते अकोट येथे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन
राष्ट्रीय आरोग्य अभियानात अकोट येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले.
परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा या रुग्णालयाद्वारे प्राप्त होतील. रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी यावेळी उपस्थित होते.