हिंदू कोड बिल निर्माण झाल्याने देशातील महीला सुरक्षित झाली – प्रा.अंजलिताई आंबेडकर
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महिला मेळाव्यात केलें मार्गदर्शन

अकोला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील वंचित महिलांसह देशातील सर्व महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदू कोड बिल निर्माण केले आणि भारतीय संविधान निर्माण करताना त्यात हिंदू कोड बिल सामाविष्ट केल्याने देशातील सर्वच समाजातील महीला सुरक्षित झाली असल्याचे मत आज प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महिला मेळाव्यात उपस्थीत महिलांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष नानासाहेब घोलप यांच्या आदेशाने महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर यांचे संकलपनेतून निर्माण झाल्यानुसार अकोला जिल्हा महिला आघाडीच्या वतीने गेल्या आठ वर्षेपासून दरवर्षी मकरसंक्रांत निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन केले जात असते . यावर्षी आज गांधी रोडवरील प्रमीलाताई ओक हॉल अकोला येथे महिला मेळावां पार पडला. या महीला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय प्रवक्ते रविंद्र राजुस्कर यांनी केलें. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा महिला आघाडीच्या प्रभारी सौ. संज्योतीताई मांगे ह्या होत्या . आणि प्रमूख मार्गदर्शक म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष एड. रोहिणीताई खडसे, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष नलिनीताई सौंदनकर, राष्ट्रीय सचिव सरोजताई बिसुरे, सौ प्राचीताई वखरे , महीला प्रदेशाध्यक्ष मीनाताई भगवतकर , प्रदेश सचिव सीमाताई राजगुरू, प्रदेश उपाध्यक्षा मीनाक्षी पानझाडे आदींच्या उपस्थितीत हा महीला मेळावा संपन्न झाला असुन महिलांनी मोठया प्रमाणावर उपस्थीती दर्शवली होती. यावेळी वीचारपिठावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर,पश्चीम युवा प्रमूख रामा उंबरकर, जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे, ज्येष्ठ नागरीक संघाचे पांडुरंग वाडेकर, सौ.मंगला चोपडे, संध्याताई घोपे, कविता बुंदे, वनिता गवई, वर्षा चीमकर छायाताई इंगळे, वंदना कांबळे, संगीता ठोसरे, अनिता पदमने ऍड बेलूलकरं, प्रतिभा चोपडे, दीपाली वाडेकर, सर्व जिल्ह्यातील महिला पुरुष उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरुवात कत्थक नृत्याने कऱण्यात आली. प्रस्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष गजानन भटकर यांनी केले.