संभाजी ब्रिगेड मध्ये उभी खिंडार
संभाजी ब्रिगेडचे युवा नेते योगेश ढोरे यांचा आपल्या समर्थकांसह वंचितबहुजन आघाडीत प्रवेश
अकोला. संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष योगेश ढोरे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश घेतला आहे.
संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत असताना त्यांनी संपूर्ण महानगरात पक्षाची बांधणी केली होती त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री प्रतिष्ठान या संस्थेद्वारे पूर्ण जिल्हात आपल्या कार्याचा ठसा सुद्धा उमटविला आहे.
ढोरे यांनी जिल्हाभरात तरुणांची एक फळी निर्माण केली आहे, जिल्ह्यातील विविध विषयावर आक्रमक पणे आंदोलन करून प्रश्न मार्गी लावले,मातोश्री प्रतिष्ठान दारे ते दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करत असतात कोरोना महामारीच्या काळात त्यांनी अनेक गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत जीवाची परवा न करता मदत केली योगेश ढोरे यांच्या सोबत राजाभाऊ शिरसाट,मंगेश माकोडे उपजिल्हाप्रमुख संभाजी ब्रिगेड, सिद्धार्थ तायडे जिल्हाप्रमुख वाहतूक आघाडी, कुशल जैन जिल्हा संघटक, संदीप उपरवट उपशहर प्रमुख,विकी पाटील साबळे, स्वप्निल शिरसाट, शुभम पाटील, मयुर क्षार, पवन दाभाडे, विकी वानखडे यांनी सुद्धा प्रवेश केला.
त्यांच्या पक्षप्रवेशावेळी वंचित चे जिल्हाप्रमुख प्रमोद देंडवे, जी प सदस्य निखिल गावंडे, म. न पा गट नेते गजानन गवाई,प्रा प्रदीप चोरे हे उपस्थित होते.