शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गनटाच्या वतीने पालक मंत्री यांना यांना निवेदन!
श्री राजेश मिश्रा शहर प्रमुख यांच्या नेत्तृत्वात जनसामान्यांच्या दृष्टीने सामाजीक बांधीलकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या खालील चार विषयांना घेऊन मा.ना. श्री विखे साहेब महसूल व पालक मंत्री अकोला जिल्हा यांना निवेदन देण्यात आले.अकोला मनपा द्ववारे लावण्यात आलेली गुंठेवारी वरील शुल्कवाढ त्वरीत रद्द करण्यात यावी. कारण की मागे या विषयावर आंदोलन केल्यानंतर व पालकमंत्री महोदय यांना भेटल्यानंतर प्रशासक आयुक्त मॅडम यांनी दहा टक्के वाढवले शुल्क कमी केला असं सांगण्यात आलं होते तरी आतापर्यंत आयुक्त मॅडम यांनी फक्त अगस्त पूर्वीचे ज्या लोकांनी अर्ज केला होता त्या लोकांचा दहा टक्के शुल्क वाढ हे त्यांनी कमी केलेले आहे ऑगस्ट महिन्यानंतर जे आलेले अर्ज आहेत त्यावर कोणताही प्रकारचा विचार झाला नसून त्याच्यामुळे आज पालकमंत्री महोदय यांना या विषयाला धरून निवेदन देण्यात आलेले आहे.अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री राज राजेश्वर मंदीरात येणा-या भक्तांकरीतात्वरीत पार्किंगची व्यवस्था करून द्यावी कारण की दररोज असंख्य भावीभक्त येत असतात त्यांना कुठे कुठल्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे तिथे रहदारीला खूप त्रास होते व भावी भक्तांना त्रास होत असल्यामुळे पालकमंत्री महोदय यांना आज पर्यायी पार्किंगची व्यवस्था व जागा उपलब्ध करून द्यावे अशी विनंती करण्यात आली किल्ल्याला लागून जागा पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावे
भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस स्टेशन जुने शहरचा विस्तार करुन ते जिल्हा परिषद उर्दु शाळा हरीहर पेठ येथे स्थलांतरीत करण्यात यावे.
NGTच्या आदेशाने 29/01/23 रोजीचे पाटबंधारे विभागाद्वारे घोषीत करण्यात आलेले मोर्णा व विद्रृपा नदीचे निळी व लाल पुर रेषा आखणी नकाशे निरस्त करण्यात यावे व पुनर सर्वेक्षण करण्यात यावे या मागण्यांसाठी निवेदन देऊन मा.पालक मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली तर त्यांनीही सकारात्मक विचारक व्यक्त करुन जनतेच्या जिव्ह्याच्या या सर्व प्रश्नांवरत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दीले.या प्रसंगी श्री राजेश मिश्रा शहर प्रमुख याचे सह उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे,शहर संघटक अनिल परचुरे मा नगर सेवक गजानन चव्हाण सुनिता श्रीवास,मंजुषा शेळके,नितीन ताकवाले मुन्ना मुन्ना उकर्डे नितीन मिश्रा पवन साईवाल रवी गायकवाड देवा गावंडे आशु तिवारी संजय अग्रवाल उपस्थित होते.