किनखेड येथे एचआय.व्ही./एड्स नियंत्रणा विषयी पथनाटयाव्दारे जनजागृती
सुनिल बांगर – किनखेड येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक अकोला व माता सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय कला व संस्कृतीक क्रिडा मंडळ पिलकवाडी ता. अकोट जि. अकोला यांच्या संयुक्त विदयामानाने एच.आय. व्ही/एड्स जनजागृती करण्यात आली या पथ नाटयाव्दारे ते लोकांपर्यंत एच.आ. व्ही/एड्स हा होतो कश्यापासुन व होत नाही कश्यापासुन हे कलेच्या माध्यमातुन सांगितले तसेच एच. आय. व्ही/एड्स रोखण्यासाठी शासनाने विविध योजना मोफत काढल्या आहेत. जर एखादया व्यक्तीला एच.आय.व्ही/एड्स लक्षणे दिसत असतील तर त्याने आय.सी.टी.सी. (आय.सी.टी.सी ) सेंटर म्हणजे सरकारी दवाखाण्या मध्ये तपासणी केलीतर एच. आय. व्ही/एड्स निघाला तर त्याची माहीती गुप्त ठेवल्या जाते त्याला ए. आर.टी. सेंटर सरकारी दवाखान्यामध्ये मोफत गोळया व ह औषधी मिळतील. व तो त्याचे जिवन जिवनभर जगु शकतो हेच नव्हे तर पथ नाटया व्दारे विविध प्रकारच्या कला करून लोकांना जागृत गेले तर हया ठिकाण भाग्योदय आरोग्य बहुद्देशिय शिक्षण संस्था यांनी पथकासाठी अतिशय चांगले नियोजन केले तर सुपरवायजर प्रशांत खेडकर, विभागिय सुपरवायझर पवन धांडे व कलाकार संस्था अध्यक्ष (शाहीर) भिमराव तायडे, स्त्री पार्ट भुमीका संतोष दामोदर (गायक), ढोलकी वादक जगन्नाथ तायडे, हार्मोनियम वादक संघपाल वा. दामोदर, (सुत्र संचालन) सिलरत्न श. अंदुरकर (टाळवादक) गुणवंत स. बांगर (कोरस गायक) तेजराव वाकोडे इत्यादी व बहुसंखेय लोक उपरतीत होते.