जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेच्या टेरेसमध्ये आढळून आले गर्भ! परिसरात एकच खळबळ!
अकोला – रतनलाल प्लॉट रोड येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालय टेरेसवर गर्भ आढळल्याने खळबळ उडाली आहे. क्रिकेट खेळणाऱ्या तरुणाचा चेंडू अचानक शाळेच्या टेरेसवर गेल्याने ही घटना समोर आली आहे. यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, सिव्हिल लाईनचे एस एच ओ यांच्यासह सर्व अधिकारी व एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गर्भ व इतर अवशेष असल्याचे आढळून आले. या शाळेसाठी वॉचमन नेमण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून अशा प्रकारे गर्भलिंगनिदान झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण जवळच सरकारी दवाखाना तसेच खाजगी रुग्णालय आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून शाळेच्या टेरेसवर भ्रूण फेकणे ही देखील चिंतेची बाब आहे.यावेळी शाळेच्या आवारात मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती.