‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याविषयी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन
अकोला वार्ता 12 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याविषयी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन
हिंदु जनजागृती समिती ,शिंदें गट शिवसेना तर्फे निवासी जिल्हाधिकारी श्री. विजय पाटील अकोला , उप पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी साहेब अकोला यांना व्हॅलेंटाईन डे संदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अश्विन नवले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चोपडे, शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री. योगेश अग्रवालजी, महिला शिवसेना चे शहर प्रमुख सौं. निशा ताई ग्यारल . शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. रमेश गायकवाड, शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री. प्रतीक मानकर , तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हिंदु जनजागृती समिती चे श्री. अमोल वानखडे, सौं. अश्विनी सरोदे, श्री. अजय खोत, श्री. राजू क्षीरसागर उपस्थित होते. प्रशासनातर्फे या संदर्भात कृती करण्याचे आश्वासन देण्यात आले.
गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे.’ व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, यादिवशी होणाऱ्या पार्ट्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी अपप्रकारांत प्रचंड वाढ होत आहे. इतकेच नव्हे, तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, हे या दिवशी होणाऱ्या अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते. तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवतात.
थोडक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे होणाऱ्या घटनांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवरही येत आहे. सद्यस्थितीत भारतात प्रती 16 मिनिटाला एक बलात्कार होत आहे, महिलांवरील अत्याचारांची भयावह आकडेवारी यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची नितांत आवश्यकता दर्शवते.
या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि समाजसेवी संघटना या ‘डे संस्कृती’ला विरोध करत भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. एकीकडे विदेशांत भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेत त्यानुसार आचरण करणाऱ्यांमध्ये वाढ होत असतांना, भारतीय युवापिढीला जाणीवपूर्वक पाश्चात्यांच्या कुप्रथांमध्ये गुरफटून टाकण्याचे षड्यंत्रही मोठ्या प्रमाणात चालू आहे. भारतीय समाजव्यवस्था उत्तम रहावी आणि अनैतिक कृत्यांमुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासह युवापिढीचे प्रबोधन करण्याचीही नितांत आवश्यकता आहे. या संदर्भात आम्ही पुढील मागण्या करत आहोत –
1. 14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेणे, वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाययोजना कराव्यात.
2. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी ‘मार्गदर्शक सूचना’ निर्देशित करण्यात याव्यात.अशी आपल्याला हिंदु जनजागृती समितीकडून विनंती करत आहोत.
फोटो कॅप्शन – उप पोलिस अधीक्षक श्री कुलकर्णी साहेब यांना व्हॅलेंटाईन डे संदर्भात निवेदन सादर करत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अश्विन नवले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री शशिकांत चोपडे, शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री योगेश अग्रवालजी, शिवसेनेचे शहर प्रमुख श्री रमेश गायकवाड, शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री प्रतीक मानकर , तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला शिवसेना चे शहर प्रमुख सौं. निशा ताई ग्यारल हिंदु जनजागृती समिती चे श्री अमोल वानखडे, सौं. अश्विनी सरोदे, श्री. अजय खोत, श्री. राजू क्षीरसागर,
फोटो कॅप्शन – निवासी जिल्हाधिकारी श्री. विजय पाटील यांना व्हॅलेंटाईन डे संदर्भात निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चोपडे, शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री. योगेश अग्रवालजी, महिला शिवसेना चे शहर प्रमुख सौं. निशा ताई ग्यारल हिंदु जनजागृती समिती चे श्री. अमोल वानखडे, सौं. अश्विनी सरोदे, श्री. अजय खोत, श्री राजू क्षीरसागर.