राष्ट्रवादी च्या प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्ष पदी सिद्धार्थ तायडे यांची नियुक्ती…!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने ‘शिवस्वराज सप्ताहाचे आयोजन..
अकोला :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने संपूर्ण राज्यात “शिवस्वराज्य सप्ताहाचे” आयोजन करण्यात आले असून याचे अकोल्यातील 7ही तालुक्यात सदर सप्ताह युवा आघाडी, महिला आघाडी, अल्पसंख्यांक सेल तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हातील सर्व विद्यालय, महाविद्यालय मध्ये विविध स्पर्धा घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र नागरिकांपर्यंत पोहचवणार असून यात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गित स्पर्धा आदींचा समावेश असणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे शिवस्वराज सप्ताह निमित्य आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.
अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
व्हिडीओ :- अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने “शिवस्वराज “सप्ताह निमित्य जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद संपन्न झाली. या मध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्ष पदी मूर्तिजापूर चे सिद्धार्थ तायडे यांची वरिष्ट स्तरावरून नियुक्ती करण्यात आली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी “शिवस्वराज “सप्ताह राबविणार असून यात शालेय व महाविद्यालय स्तरीय विविध स्पर्धा राबविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, तालुकाध्यक्ष जगदीश मारोडकर, प्रदेश अल्पसंख्यांक सचिव सरवर बेग मिर्झा, प्रदेश सामाजिक न्याय उपाध्यक्ष सिद्धार्थ तायडे, उपाध्यक्ष गौरव देशमुख, राम अमानकर, बद्रू जमा,महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष वाकोडे ताई, उपाध्यक्षा वाघमारे ताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.