सस्ती येथील शेतकऱ्याचे तीन लाखाचे सोने केले परत
दिग्रस येथील व्यक्तीचा प्रामाणिकपणा
शाळेला २१००/- रूपयांची देणगी

*वाडेगाव:- जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी राजकुमार चिकटे यांचा चान्नी वाडेगांव रस्त्यावर रसवंतीचा व्यवसाय करीत असून त्यांच्या दुकान समोर ११ फेब्रुवारी ला सस्ती येथील शेतकरी हरीभाऊ मालठाणे हे सपत्नीक बाहेरगावाहून परत येतांना त्या ठिकाणी पिशवी ठेवली. त्या पिशवीत तब्बल ३.०० लाख रुपये किंमतीचे दागिने होते. ती पिशवी न घेता निघून गेले. परंतु राजकुमार चिकटे यांना दिसलेली एक बॅग परत केल्याने राजकुमार चिकटे यांनी परत दिल्याचा प्रामाणिक पणा दिसून आला आहे.
सोन्याची राहिलेली बॅग उघडून पाहिले तर त्या मध्ये सोन्याचे दागिने होते. त्यांनी पिशवी उचलून घरात ठेवली. मालठाणे परिवाराचे लक्षात रात्री उशिरा आले की, आपली पिशवी कुठे आहे. तेव्हा त्यांनी रसवंतीवर पोहोचले. व माझी पिशवी इथे राहीली का अशी विचारणा करताच चिकटे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता प्रामाणिकपणे परत केली. त्यांच्या प्रामाणिकपणे बद्दल मालठाणे परिवाराने त्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून द्यायचे ठरवले तेव्हा. त्यांनी सांगितले मला जे बक्षीस देणार ती रक्कम आमचे शाळेला द्यावी. शालेय स्नेहसंमेलन सुरू असतांनाच ही बाब लोकमत पत्रकार राहुल सोनोने यांनी मुख्याध्यापक संजय बरडे यांना सांगीतल्यावर लगेच त्या सर्वांना मांचावर बोलावून घेतले व हरिभाऊ मालठाणे यांनी शाळेला २१००/- रुपये देणगी दिली. त्याबद्दल शाळेच्या वतीने राजकुमार चिकटे आणि मालठाणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कल्पना गवई, सरपंच आशाताई कराळे व इतर मान्यवरांसह दिग्रस बु, दिग्रस खु. तांदळी बु. तांदळी खुर्द, सस्ती, तुलंगा येथील पालकमंडळी व गावकरी मंडळी उपस्थित होते.