अकोला महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस राबवणार शिवस्वराज्य सप्ताह – विजय देशमुख
अकोला – राष्टवादी कॉंग्रेस पार्टी चे वतीने संपूर्ण राज्यभर १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या “ स्वराज्य सप्ताहा ” चे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषगाने अकोला महानगर कॉंग्रेस पार्टी हा शिव स्वराज्य साप्ताह उत्साहपूर्वक साजरा करण्यात येणार असल्याचे विजय देशमुख यांनी अकोला महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालयात आयोजित बैठकीत केले असून या निमित्त अकोला महानगरातून भव्य मोटार सायकल रली काढून शिवाजी पार्क येथे या रलीचे समारोप होणार आहे. त्याच बरोबर पालखी सोहळा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गडकिल्ले सेल्फी पोइंट, गडकिल्यांची साफसफाई, “सबका राजा शिवाजी राजा “ यावर व्याख्याते जेष्ठ पत्रकार सय्यद अली अंजुम यांचे व्याख्यान आदिसह विविध कार्यक्रमाचे आयोजन या सप्ताह निमित्त करण्यात येणार आहे
सदर बैठकीत अकोला महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख , माजी नगरसेवक अजय रामटेके, मनोज गायकवाड, फय्याज खान, रहीम पेंटर, नितीन झापर्डे, दिलीप देशमुख, अफसर कुरेशी, संतोष डाबेराव, सुधीर कहाकर, अशोक परळीकर, महिला अध्यक्षा सुषमाताई निचळ युवक महानगरअध्यक्ष अजय मते, अल्पसंख्यक महानगर अध्यक्ष अब्दुल अनिस बुढन गाडेकर , यश सावल, ओबीसी सेलचे महानगर अध्यक्ष अनिल मालगे, अज्जू कप्तान, आकाश धवसे , वैभव घुगे , शेख मुस्ताक, सोनू पठाण रोहित देशमुख आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते