नमो चषक कबड्डी 2024 अंतिम सामना रंगला

नमो चषक कबड्डी 2024 अंतिम सामना रंगला

चुरशीच्या लढतीत उगवा कबड्डी संघाने मारली बाजी
प्रथम क्रमांक 41 हजार रुपये रोख बक्षीस चे ठरले मानकरी

पातुर शहरातील ऐतिहासिक दसरा मैदानं येथे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने नमो चषक कबड्डी स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती हि स्पर्धा अकोला जिल्हा खासदार संजय भाऊ धोत्रे, आमदार रणधीर भाऊ सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार,भारतीय जनता पार्टी युवा नेते अनुप धोत्रे, यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धाचे 12 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बाळापूर मतदार संघातील एकुण 40 कबड्डी संघांनी सहभाग नोंदविला होता तर सलग तीन दिवस स्पर्धेचा आनंद हा कबड्डी प्रेमींनी घेतला या कबड्डी स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी बोडखा येथील नवदुर्गा कबड्डी संघाने रोख रक्कम 15 हजार रुपयानसह पटकावला तर द्वितीय क्रमांक शिलाऀ येथील तपें हनुमान कबड्डी संघाने रोख रक्कम 25 हजार रुपयानसह पटकावला आनि पहील्या क्रमांकावर उगवा येथील कबड्डी संघाने 41 हजार रुपयानसह प्रथम क्रमांक मिळविला तर या स्पर्धेमधील अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला या सामन्यात अनेक वेळा पंच, व. एम्पायर यांना स्पर्धेतील गुणवत्ता देणें मोठे कठीणाईचे झाले होते. हा अंतिम सामना खुप वेळ रंगला व दोन्ही संघांनी मोठे चातुर्य दाखविले व प्रेक्षकांना आकर्षित करणारा असा हा समणा ठरला, ही स्पर्धा माजी सभापती तपें हनुमान व्यायाम शाळेचे संचालक पैलवान बालू बगाडे उर्फ अनंता बगाडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मैदानं येथे आयोजित करण्यात आले होते तर या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष माजी आमदार बळीराम सिरस्कार, अकोला जिल्हा अध्यक्ष मांगटे पाटील, विजय सिंह गहिलोत सर, रमण जैन,पातुर तालुका अध्यक्ष भिका धोत्रे, न.प माजी उपाध्यक्ष राजु उगले, प्रेमानंद श्रीरामे,चंद्रकांत अंधारे, सचिन ढोणे,मंगेश केकण, पातुर शहर अध्यक्ष अभिजीत गहिलोत, संदिप तायडे, दिलीप डोंगे, विनेश चव्हाण, बाळू गोतरकार, गजानन शेंडे, कपिल खरप, दिगंबर गोतरकार, गजानन गुजर, निलेश फुलारी, किरण फुलारी ,सचिन सेवलकर, विशाल कुटे, निरज कुटे अर्जुन लसनकार, संतोष लसनकार, पुरुषोत्तम भगत, संतोष सावत, डॉ भिशे, गणेश गाडगे, गोलू बयस,नविन करंगाळे.पत्रकार देवानंद गहिले, निखिल इंगळे, किरण कुमार निमकंडे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी एम्पायर म्हणून श्री विठ्ठल लोथे, संजय मुखाडे, डि आर चव्हाण, गणेश राठोड, अजय राठोड, बबनराव घुगे, किशोर राठोड, सिरसाठ सर अकोला जिल्हा कबड्डी असोसियन चे सदस्य मंगल सिंग ठाकुर, यांनी काटेकोर निर्णय देऊन एम्पायर म्हणून अथक परिश्रम घेतले, तर विजेते कबड्डी संघाचे कोच म्हणून प्रथम क्रमांक उगवा कबड्डी संघाचे भुईभार सर, द्वितीय क्रमांक शिलाऀ येथील तपें हनुमान कबड्डी संघाचे गोपाल काकड, व तृतीय क्रमांक कबड्डी संघाचे कोच दिनेश चव्हाण यांनी आपापल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले, व या वेळी तपें हनुमान व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news