पातुर शहरात संत सेवालाल जयंती साजरी
जयंती निमित्त प्रसाद पाटप
शेकडो च्या संखेने भाविकांची उपस्थिती
संत सेवालाल महाराज हे पर्यावरण संरक्षणासाठी सतत कार्यरत असणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी मानवता, सत्य, अहिंसा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वांना दिला. समाजातील व्यसनाधीनता, अनिती तसेच अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मह्तवपूर्ण कार्य केले असून त्यांचे प्रबोधनात्मक विचार भावी पिढीने जोपासले पाहिजेत, असे मत संत सेवालाल भवन ट्रस्ट चा सदस्यांनी व्यक्त केले.
पातुर शहरातील खानापूर रोड येथील सर्व बंजारा समाजातील व परिसरातील भाविकांनी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सेवालाल महाराज यांना अभिवादन केले सेवालाल महाराज जयंती निमित्त परिसरातील नागरिक उपसथित होते यावेळी पातुर नामदेव जाधव धनंजय शेटे, महेश राठोड, कमल सिंग राठोड, राजेश राठोड, , दिलीप जाधव, संतोष राठोड, रंजिव राठोड, दर्शन राठोड, , निलेश जाधव, भोसले सर, बलराज राठोड, रवींद्र जाधव, अनिल जिजोरे, प्रकाश चव्हाण, मोहन चव्हाण, गजानन झाडे, आडे सर नितीन जाधव महेश राठोड,अधिष चव्हाण,पत्रकार निखिल इंगळे , किरण कुमार निमकंडे, यांची उपस्थिती होती
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा