डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान काढल्याने गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्येचा केला प्रयत्न!
पातूर तालुक्यातील चांन्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांडुणाऀ ग्रामपंचायत प्रवेशद्वाराचे प्रकरण ठाणेदार यांच्या अंगलट आलें आहे मागिल महीण्यात 24 तारखेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांची मुख्य प्रवेश द्वर कमान रात्रीचे वेळेस अंधारामध्ये कमान पाडली असता गावकऱ्यांनी चांन्नी चे ठाणेदार यांच्या वर कार्यवाहीची मागणी केली होती व 16/02/024 पर्यंत ठाणेदार यांच्यावर कारवाई करा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे विभागीय पोलिस अधिकारी,व अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना देण्यात आला मात्र अद्याप पर्यन्त ठाणेदार यांचेवर कार्यवाही न झाल्याचे पाढुणाऀ गावकऱ्यांनी म्हटले आहे त्यामुळे आज दिनाक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पोलिस अधीक्षक अकोला यांचे कार्यालया सामोरं आत्म दहन केले आहे व त्या मधे दोन नागरिकांनी विष प्राशन केले सदर गावातील दोन आंबेडकरी चळवळीतील विष प्राशन केलेल्या नागरिकांना शासकीय रुग्णालय अकोला येथे पोलिस प्रशासनातर्फे भरती करण्यात आले आहे सदर नागरिकांची तब्येत खालावली असून अकोला जिल्यातील आंबेडकरी अनुयामध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे व चान्नी ठाणेदारासह पोलिसांचा तीर्व निषेध व्यक्त करण्यात येतं आहे.
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा