बाळापूर पोलिसांनी टायर चोरी करणाऱ्यांना दोघांना घेतले ताब्यात
२,७०,००० रू केला मुद्देमाल जप्त
प्राप्तमाहितीनुसार फिर्यादी नामे शेख नदीम शेख नबी वय ३५ वर्ष रा बटवाडी बाळापुर व्यवसाय ट्रकमालक यांनी पोस्टे बाळापुर येथे जबानी रिर्पाट दिला की त्याची टाटा ४०७ गाडी एमएच २७ एक्स १८९४ ही असुन रात्री दरम्यान बाळापुर बसस्थानक परीसरात उभी करत असतात त्याच अनुषंगाने
दिनांक १४/२/२४ रोजी सकाळी त्यांनी गाडीची पाहणी केली असता त्यांना त्याचे गाडीचे मागील बाजुचे एम. आर. फ कंपनीचे दोनटायर कि ३००००/रु दिसुन आले नाही वरून त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आले नसून त्यांनी पोस्टे बाळापूर येथे जबानी रिर्पाट दीला असून पोस्टे बाळापुर येथे अप क्रमांक ११०/२४ कलम ३७९ भादविचा अज्ञात ईसमाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच बाळापूर पो. स्टे. माहिती मिळाली की सदर टायर हे गाडी क्रमांक टाटा ४०७ एम. तपासा दरम्यान पोस्टे बाळापुर येथील ठाणेदार श्री अनिल जुमळे. एच.११ टी २५६४ ला लागलेले दिसुन आले तरी त्यांनी पोलीस स्टॉफ पथक नेमुन सदर गाडीचा बटवाडी भागात शोध घेतला असता सदर गाडी मिळुन आली सदर गाडी मालक नामे सैयद अहेमद सैयद अजगर वय २२ वर्ष रा. कागजीपुरा बाळापुर याला विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिले असून सदर ठिकाणी फिर्यादी यांना बोलावुन टायरचे पाहणी केली असता त्यांनी त्यांचे टायर ओळखले वरून नमुद ट्रक मालक यास विचारपुस केली असता सदर टायर हे त्याला अक्षय सुरेश मोरे वय २० वर्ष रा. गाजीपुर बाळापुर याने दिले आहे. वरून अक्षय मोरे यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व एक महीना अगोदर सुध्दा सदर घटनास्थळावरून शेख रईस शेख वाहेद रा. बाळापुर यांच्या गाडीचे अपोलो कंपणीचे दोन टायर कि. ४०००० रू.चोरी केले व ते सुध्दा ट्रक मालकास विकले आहे. तसेच सदर गाडीची पाहणी केली असता चोरी गेलेले टायर सुध्दा मागील बाजुस लावलेले दिसुन आले. वरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन ४ टायर किंमत ७०,००० रू.व गाडी टाटा ४०७ क्र.एम.एच.११ टी. २५६४ किंमत २,००,००० रूपये असा एकुण २,७०,००० रूपयाचा मुददेमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सा. श्री. बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी सा. श्री. गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल जुमळे, पोउपनि श्रीमती वर्षा राठोड, पोहेकॉ गोपाल ठाकुर , अनंत सुरवाडे, पोशि. निखील सुर्यवंशी, सुरेश भारसाकळे, योगेश सुगंधी, प्रविण अवचार, अक्षय देशमुख व सुधाकर वानखडे यांनी केली
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर