सिरसो त एका शेतात आढळला 50 वर्षीय इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह..!
मूर्तिजापूर शाम वाळसकर सह प्रतिनिधी प्रतिक कुऱ्हेकर सत्य लढा न्यूज अकोला. – अकोला जिल्हातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सिरसो परिसरात शुक्रवार च्या मध्यरात्री एका 50 वर्षीय इसमाचा शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आधळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो शिवरात असलेल्या रहीम यांच्या शेतातील पोर्टी फार्म मध्ये मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित बालाजी चौक येथे राहणाऱ्या सै. सलीम सै. मुस्ताक वय 50 यांचा 100 % जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून सै. सलीम सै. मुस्ताक हे आपल्या राहत्या घरून शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते. त्यांची इतरत्र शोध सुरु असतांनाच रात्री 9.30 च्या दरम्यान रहीम याने फिर्यादीस फोन करून “सलीम भैया” जल गया असे सांगितले असतात मृतकाचे नातेवाईक, शहरातील काही नागरिक व पोलिसांनी धाव घेऊन घटना स्थळ गाठले असतात मृत सलीम हे 100% जळालेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांच्या सांगण्यावरून मृतक सलीम यांची गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे मात्र हा मृत्यू की घातपात अशी चर्चा शहरात सुरु असून पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके व शेख इरफान करीत असून उत्तरीय तपासणी करीता मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.