क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या
हिवरखेड पोलीस ठाणे हद्दीतील दानापूर येथील घटना

अकोला – कार अपघाताच्या बहाण्याने तरुणाची लाठ्याकाठ्याने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. देवानंद उत्तम तायडे असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हिवरखेड पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्यांना पकडण्याची कारवाई सुरू आहे. हिवरखेड तालुक्यातील दानापूर गावात काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. देवानंद उत्तम तायडे हे रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यानंतर त्यांच्या गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांना धडक दिली, यावरून वाद झाला, काही वेळातच हा वाद इतका वाढला की प्रकरण हत्येपर्यंत पोहोचले, संतप्त चार ते पाच लोकांनी एकत्र येऊन देवानंद यांच्या छातीवर आणि पाठीवर वार केले. त्याच्या डोक्यावर लाठ्याकाठ्याने वार करून जखमी केले. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर देवानंदचे मारेकरी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.