संघर्ष हाच शेतकऱ्यांच्या हितासाठी
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात सर्वाधिक भाव मिळवून देण्यासाठी माझी संघर्ष यात्रेद्वारे शासना पुढे मांगणी – आमदार नितीन देशमुख
आमदार नितीन देशमुख यांची अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पायदळी 500 किलोमीटर संघर्ष यात्रा
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – पातुर बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी 15 फेब्रुवारी रोजी संघर्ष यात्रेद्वारे पायदळ यात्रा सुरू केली आहे हि यात्रा मुर्तीजापुर तालुक्यातील संत गाडगेबाबा संस्थान दापुरा येथुन प्रारंभ करण्यात आली आहे या यात्रेचे स्वरूप हे शेतकरी यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी शासन दरबारी नोंद करण्यात यावी अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांची आहे खरे म्हणजे शासकीय निकषानुसार शेतकरी यांचा माल खरेदी करताना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आजच्या घडीला महागाई दर खुप वेगाने वाढत आहे. त्यातल्या त्यात शासकीय नोकरदार वर्ग यांना महागाई भत्ता, वेतन वाढ दरवर्षी वेगाने वाढत आहे.
आणि आजच्या काळात शेतकरी मालाला योग्य भाव मिळत नसल्याने हतबल झाला आहे. शेतकरी हा दर वर्षी आसमानी संकटाला तोंड देत आहे .आणि शेत मजुरी दिवसेंदिवस वाढत आहेत .वेळेवर मजुर सुद्धा मिळत नाहीत, आणि बी बियाणे, व पिकांना लागणारी खते, कीडनाशके यांचा दर खुप उंचावला आहे. तेवढेच नाही तर सर्व क्षेत्रात महागाई वाढल्याने शेतकरी हा भुमीहीण होण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी संघर्ष यात्रेद्वारे पायदळ यात्रा ही 15 फेब्रुवारी रोजी सुरू केली आहे. व या यात्रेचे स्वरूप मुर्तीजापुर तालुक्यातील संत गाडगेबाबा संस्थान दापुरा येथुन प्रारंभ करण्यात आली आहे.व या यात्रेचा समारोप अकोला येथील राज राजेश्वर मंदिर येथे होनार असल्याची माहिती पातुर शहर प्रमुख निरंजन बंड यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर, बार्शी टाकळी, पातुर, बाळापूर, अकोला,अकोट, तेल्हारा या तालुक्यात पायदळी 500 किलोमीटर चालून शेतकरी यांच्या हितासाठी संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे.
यावेळी संघर्ष यात्रे मंध्ये माजी आमदार संजय गावंडे, माजी आमदार दाळू गुरूजी, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शिवसेना नेते सेवकराम ताथोड, दीपक बोचरे, माजी नगराध्यक्ष हिदायत खा रुम खान, राहुल कराळे, गजानन मनतकर, रवींद्र मुर्तंडकर, आनंद बनकर ,प्रवीण तायडे ,ज्ञानेश्वर मैसने,दीपक भोसले, विशाल बर्डे ,आनंद, फाळके गोपाल पाटील ढोरे सुरज झळपे, परशराम उंबरकार, सुनील गाडगे, अनिल निमकंडे, डॉ डिगांबर खुरसडे, कैलास बगाडे,यांच्यासह शेकडो पदाधिकारी संघर्ष यात्रेत सहभागी होते तर या यात्रेदरम्यान शेकडो मुस्लिम बांधवांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षा मध्ये आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला संघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पातुर शहरप्रमुख निरंजन बंड शंकर देशमुख, सागर रामेकर, दिलीप देवकर, सागर कढोणे, अजय पाटील ,सचिन गिरे, दिलीप फुलारी,आनंद तायडे, अनिल निमकंडे, रवी काकड, दिनेश काळपांडे, अंबादास देवकर, दिगंबर इंगळे, गणेश पाटील, विशाल तेजवाल, अजाबराव चव्हाण, महफूज भाई, सुधाकर शिंदे, सुरज झळपे, गजानन पोपफघट, संतोष गवई, यांच्या सह समंस्त शिवसैनिक उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छोटू काळपांडे यांनी केले तर शेतकरी संघर्ष यात्रा मिरवणुकीमध्ये संत सिदाजी महाराज महिला व बाल भजन मंडळ यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व खडकेश्र्वर व्यायाम प्रसारक मंडळाचे मुलींनी भारत मातेचे तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा वेगवेगळया वेशभूषा धारण करून संघर्ष यात्रेचे आकर्षण ठरले,