बाबुळगाव आलेगाव रोडवर दुचाकीचा अपघात एक ठार एक गंभीर जखमी…
पातुर तालुक्यातील बाबुळगाव आलेगाव रोडवर जामरूळ फाटा येथे दुचाकी च्या अपघातामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता घडली आहे. अपघातामधील जखमी युवकाला स्थानिकांच्या मदतीने अकोला येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल आहे. दरम्यान बाबुळगाव आलेगाव रोडवरील जांभरूळ फाट्या जवळ आज सकाळी दोन दुचाकी धारक आलेगाव कडे दुचाकि ने जात असताना दुचाकी ही अनियंत्रित होऊन अपघात झाला.. सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार पातुर येथील समता नगर मधील दोघे युवक आपल्या दुचाकी वाहनाने जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दुचाकीची जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीने जाणारे दोन्ही युवक हे बाजूला रोडवर आदळले. यामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत पातूर पोलिसांना माहिती देण्यात आली पातुर पोलीस घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई करीत आहेत.. ही घटना आज दिनांक २० फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी ११:३० मिनिटांनी घडली आहे..