मेडशी अरुंद पुलाला कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता – मेडशी येथील प्रकार

मेडशी अरुंद पुलाला कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता – मेडशी येथील प्रकार

प्रतिनिधी@सोयल पठाण मेडशी

मालेगावः मेडशी अकोला नांदेड एक्सप्रेस हायवे वर मेडशी हे गाव असून गावाच्या पश्चिमेला गावाच्या नजीक एक छोटा पुल आहे. बरेच दिवसापासून या पूलाला कठडे नाहीत. त्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मेडशी अकोला रोडवर गावाच्या लगत हा पूल असून येथून दररोज ह्या मार्गे हजारो वाहने जातात. तसेच गावातील जनावरे माणसे सुद्धा याच पुलावरून ये-जा करत असतात.

या अगोदर सुद्धा याच पुलावर रस्ता अरुंद असल्यामुळे आणि दोन्ही बाजूला कठडे नसल्यामुळे कित्येक लहान मोठ्या वाहनांचा अपघात होऊन काहींना मृत्यू आला तर काहींना कायमच अपंगत्व आलं. आणि रात्रीच्या वेळी दोन जड वाहने समोरासमोर आल्यावर वाहन चालकाला या पुलाचा व अरुंद रस्त्याचा एकदम लक्षात येत नाही. परिणामी बरेचसे वाहने हे कळत नकळत खाली पडतात. किंवा अचानक आलेल्या वाहनामुळे गावातील जनावरांना शेतात चरायला जाताना किंवा चरून येताना रस्त्याचा बाजूला कुठून व्हायचं किंवा रस्त्याच्या खाली कुठून उतरायचं हे कळत नाही. त्यामुळे जनावरे धास्तावून पुलाखाली पडतात किंवा उडी मारतात. त्यामुळे शेतकऱ्याचे पशुधनाच पडून मोडून नुकसान होत आहे. तरी लवकरात लवकर ह्या अरुंद पुलाला कठडे लावून तिथं रात्रीच्या उजेडात चमकणारे फलक सुद्धा लावावे अशी मागणी मेडशी येथील नागरिकांच्या व पशू पालकाच्या वतीने होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news