पातुर जुने बस स्थानकावर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवांचा रास्ता रोको आंदोलन
पातूर तालुका प्रतिनिधी
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाची दखल शासनाने तात्काळ घेण्याकरता शासनाचे लक्ष वेधावे म्हणून सकल मराठा समाज बांधव पातुर तालुक्याच्या वतीने पातूरचे जुने बसस्थानकावर आज 24 फेब्रुवारी 2024 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी उपोषणाची दखल तात्काळ न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाज पातुर तालुका संयोजक राजेश देशमुख आणि मराठा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष राम मुळे यांनी दिला आहे.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये सकल मराठा समाजाचे संयोजक राजेश देशमुख, राम मुळे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष महासंघ सुरेश ठाकरे जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ, देवराव पाटील हागे माजी केंद्रीय उपाध्यक्ष के एम देशमुख जिल्हा उपाध्यक्ष ,विनायक गायकवाड सरचिटणीस अकोला जिल्हा मराठा महासंघ तसेच काँग्रेस नेते पातुर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुरहान भाई. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष नईम खान, युवक काँग्रेसचे सय्यद अजहरोद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बब्बू डॉन, तसेच सुरेश देशमुख, शंकर देशमुख, सुधीर देशमुख, प्रदीप देशमुख, अमित देशमुख, निलेश देशमुख, रवी देशमुख, मदन सरकटे, दिलीप देशमुख, नंदू लाहोळे, आदी सह इतर सकल मराठा समाज बांधवांचा यावेळी समावेश होता उपस्थित सर्व समाज बांधवांनी सहकार्य केल्याबद्दल सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने संयोजक राजेश देशमुख यांनी यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले