अकोला – मूर्तिजापूर मार्गावर नुकताच सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यावर अकोला पासिंग अर्थातच MH 30 पासिंगच्या चारचाकी गाड्यांचा टोल माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलंय..
अकोला ते मूर्तिजापूर हा कमी अंतर असल्याने रोज या मार्गावरून अकोलेकर मोठ्या संख्येने येथून प्रवास करतात आणि त्यांच्याकडून ये – जा करिता 175 रुपये आकारण्यात येतात..या सोबतच शेतकरी सुद्धा शेत माल घेऊन या मार्गावरून जातात त्यामुळे त्यांनाही आर्थिक भुर्दंड लागत असल्याचा आरोप वंचितने केलाय..वंचित कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर प्रचंड नारेबाजी करत अकोला पासिंग गाड्यांचा टोल माफीच्या घोषणा दिल्या.. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता..तर महामार्ग अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला असून दिलेल्या वेळेत मागणी पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा वंचित ने दिलाय…