खेट्रीच्या सरपंचांनी घेतली विद्यार्थ्यांच्या आहार टिफिन बॉक्स ची दखल
खेट्री येथील मराठी शाळेतील 160 विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स चे वाटप
पातुर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील मराठी शाळेमध्ये आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील 160 विद्यार्थ्यांना विद्यार्थींच्या सोई करिता डब्बा टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील मराठी शाळेतील विद्यार्थी यांच्या शिक्षण क्षेत्रातील दर्जा व शाळेविषयी विद्यार्थ्यांचे आकर्षण, व टक्केवारी उंचावण्याकरिता खेट्री चे सरपंच जहुर खान यांनी विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता टिफिन बॉक्स वाटप केले यामुळे विद्यार्थ्यींन मंध्ये खुशी चे वातावरण निर्माण झाले आहे तर यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देवरे सर खेट्री चे सरपंच जहूर खान, कचाले गुरुजी ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राष्ट्रपाल तिडके, गजानन लांडे,बाबुराव तिडके पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा