खिचडी खाल्याने विषबाधा शिवसेना वसाहत मधील घटना
मनपा मराठी मुलांची शाळा क्र.26 मधील घटना
अकोला :- महानगरपालिकेची शिवसेना वसाहत मधील मराठी मुलांची शाळा मध्ये विद्यार्थांना दिल्या जाणाऱ्या खिचडीत मेलेला उंदराचे अवशेष आढळल्याने एकच खडबळ उडाली. खिचडी खांल्याने शाळेतील मुलांना मळमळ होत उलट्या झाल्याने ताबडतोब जिल्हा रुग्णालय येथे भरती केल्याने पुढील अनर्थ टळला.
जुने शहरातील शिवसेना वसाहत मध्ये महानगरपालिकेच्या शाळा क्र.26 मध्ये खिचडी खांल्याने लहान मुलांना विषबाधा झाल्याने तेथील नागरिकांनी ताबडतोब जिल्हा रुग्णालयात भरती केले.सध्या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने पुढील अनर्थ टळला.याला जवाबदार असलेल्या कंत्राटदारावर तेथील माजी नगर सेविका यांनी तत्काळ दखल घेत जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिक माहिती घेतली असता आधी खिचडिचा कंत्राट बचत गटांना देण्यात येत होता परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकार्यांनी टक्केवारी च्या नादात झोन मार्फत कंत्राटदार नेमुन खिचडी त भ्रष्टाचार केला असल्याने यामध्ये जे कोणीही अधिकारी, कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. सत्य लढाने याबाबत मनपा उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला असता उपायुक्त यांनी दुरध्वनी ला प्रतिसाद न देता आपली जवाबदारी झटकण्याचा केविलवाणी प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यानंतर प्रशासन अधिकारी प्रमोद टेकाडे यांच्याशी संपर्क साधला असता या बाबत सविस्तर चौकशी करुन योग्य कार्यवाही करण्याचे बोलून दाखवले.
आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची बदली होताच अधिकारी किती सक्षम आहे याची प्रचिती शिवसेना वसाहतील नागरिकांनी अनुभवली
असा प्रकार पुन्हा घडु नये याकरिता मनपा प्रशासन किती दक्ष हे येणाऱ्या काळात समजेल शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी या प्रकारावर आपली नाराजी व्यक्त केली यापूर्वी शाळेच्या परिसरातील बचत गटांना खिचडी बनवायची काम दिले जायचे ते खिचडी बनवायचे काम अतिशय चांगल्या प्रकारे व्हायचे मात्र मनपा प्रशासनाने सदर काम बंद केले. याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून सदर काम बचत गटांना देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली तसेच खिचडी मध्ये विषबाधा झाल्यामुळे अश्विनी नवले यांनी नाराजी व्यक्त करत असला प्रकार घडल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अश्विन नवले यांनी दिला आहे.