वाशिम बायपास किराणा दुकानात चोरी घटना सि.सि.टि.व्ही मध्ये कैद!
अकोल्या शहरात भल्या पहाटे सुद्धा चोरीच्या घटना घडत आहे. वाशिम बायपास वरील पहाटे ५ वाजेच्या दरम्यान वाशिम बायपास रोड वरील संतोष किराणा शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील हजारो रुपये लंपास केले या घटनेमध्ये एकूण ४ अज्ञात चोरट्यांनी दोन बुलेट दुचाकी घेऊन आले होते. त्यातील दोन चोरट्यांनी कीराणा दुकानाचे शेटर वाकऊन दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झाले. मात्र एका चोरट्याचे तोंडाला बांधलेला रुमाल सुटल्यामुळे सदर घटना सि.सि.टि.व्ही मध्ये कैद झाली असून आता सदर चोरट्याचा शोध पोलीस युद्ध पातळीवर करीत आहेत.