तुकडेबंदी तसेच गुंठेवारी खरेदी सुरू करावी या मागणी करिता आज अकोला प्रॉपर्टी ब्रोकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन!
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय अकोला यांच्याकडून अकोला जिल्ह्यातील नागरिकांचे तुकडाबंदी मधील तसेच गुंठेवारी मध्ये येत असलेल्या प्लॉटची खरेदी बंद करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत. आहे सदर प्रकरणामधील तुकडेबंदी तसेच गुंठेवारी खरेदी सुरू करावी या मागणी करिता आज अकोला प्रॉपर्टी ब्रोकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बरेच प्लॉट असे आहेत की ज्यांचे रीतसर सबडिव्हिजन होणे शक्य नाही, परंतु ज्यावेळी तुकडा बंदी नव्हती त्यावेळी अशाच प्लॉटचे आधीच तुकड्यात रूपांतर करून वेगवेगळ्या खरेदी करून देण्यात आलेले आहेत. सदर प्लॉट मालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून त्यांनी काटकसर करून हे तुकडा पाडलेले प्लॉट काही वर्षाआधी खरेदी केले होते, परंतु सध्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय अकोला येथे तुकड्याच्या व गुंठेवारी प्लॉटची खरेदी बंद करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये गरीब लोकांना दयनीय परिस्थिती मधून मुलांच्या शिक्षण, दवाखाना, मुलांच्या लग्नासाठी व इतरही कारणांमुळे आपला प्लॉट विकायची गरज भासल्यास ते सदरचा प्लॉट विकू शकत नाही, किंवा ज्यांच्याकडे भांडवल आहे असे लोक सदर प्लॉट खरेदी सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे या निर्णयाने गरीब जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. सदर विषयांमधील नवीन प्लॉटमध्ये तुकडांना पडण्यासाठी लागू करावा परंतु याआधी ज्या प्लॉटचे तुकडे रूपांतर झालेले आहे तसेच गुंठेवारीच्या प्लॉटचे निदान खरेदी विक्रीची परवानगी देण्यात यावी. या मागणीकरिता आज अकोला जिल्ह्यातील सर्व प्रॉपर्टी ब्रोकर्स यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तुकडेबंदी तसेच गुंठेवारी प्लॉटची खरेदी सुरू करावी अशी मागणी केली आहे