चोरीच्या घटना घडल्यानंतर व्यापाऱ्यांनी महापालिका आणि पोलिस विभागाला निवेदन.
अकोला शहरातील अलंकार मार्केटमधील आठ दुकानांमध्ये एकाच रात्री चोरीच्या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची घटना घडल्यानंतर अलंकार मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शिवसेनेचे अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांना घटनास्थळी बोलावून घेतले.राजेश मिश्रा यांनी घटनास्थळी पोहोचून व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर व्यापाऱ्यांनी अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त गीता वंजारी व उपायुक्त पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन मागणी केली की, दर रविवारी दुकाने बंद असल्याने विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने इतर लोक लावतात. ज्यावर बंदी घालून येथे पोलीस चौकी स्थापन करावी. तसेच बाजाराला गेट बसविण्याची मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यासह अलंकार मार्केटचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.