आयुक्तांच्या बदली बाबत तर्कवितर्क? एका मंत्र्याच्या फोनने घमासान?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांची बदली रद्द होण्याची संकेत?
अकोला :- महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या बदलीचे आदेश झाल्याने मनपात कही खुशी कही गम ची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु अद्याप ही नवनियुक्त आयुक्त यांची नगरविकास खात्याने नावाची घोषना न केल्यामुळे मनपात तर्कवितर्क सुरु असुन लोकसभा निवडणूक बघता आयुक्तांच्या बदलीला स्थगिती मिळू शकते? त्यामुळे मनपा आयुक्त ह्या कोणत्याही क्षणी अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्याची शक्यता वर्तुली जात आहे?. विशेष म्हणजे ज्या अधिकार्यांनी आयुक्तांच्या बदलीच्या खुशीत ओली पार्टी केली होती. या पार्टीमुळे त्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे.
अधिक माहिती घेतली असता आयुक्तांच्या बदलीचे आदेश आल्याने मनपातील अधिकार्यांनी जल्लोष साजरा करीत फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता त्या अधिकाऱ्यांची आता खैर राहणार नाही हे विशेष! तसेच युनियनच्या डिपीवर आयुक्तांचा फोटो टाकुन आम्ही किती खुश आहो हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न झाला आहे. डिपीच्या फोटोबाबत विचारले असता आमची मर्जी असे उद्धट उत्तर दिल्याने अधिकारी यांना सोयरसुतक नसल्याचे यावरुन दिसुन आले. आयुक्तांची रजा कालावधी 1 मार्च असुन शनिवार रविवार नंतर 4 मार्च किंवा 11मार्च ला येणार असून मनपा मधील अधिकारी वर्ग चिंतेत असल्याचे दिसुन येते.आता येणाऱ्या काळात समजेल नवनियुक्त आयुक्त मनपात रुजू होतात की पुन्हा कविता द्विवेदीच पदभार स्विकारतात याकडे सामान्य नागरिकांचे तसेच मनपातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.