बाळापुर वाडेगाव मार्गावर विचित्र अपघात अपघातात तीन ठार तीन जखमी!

वाडेगाव रोडवरील अपघातात तीन ठार , तिन जखमी

 

बाळापूर :- दोन दुचाकींची धडक झाल्याने दुचाकीवरुन खाली पडलेल्या तिघे जणांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना बाळापूर ते वाडेगाव दरम्यान अकोला टि पॉईंटवर सोमवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एकाच परीवारातील तिघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतक हे आपल्या एमएच ३० बि यू ०५३२ या दुचाकीने बाळापूरकडे येत होते. यादरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही महामार्गाच्या मधोमध दुचाकीवरुन खाली पडले. या दरम्यान बाळापूरकडून पातूरकडे जाणारा भरधाव कंटेनरने या तिघांना चिरडत पुढे निघून गेला. अचानक तिघेही महामार्गावर पडल्याने कंटेनर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा भिषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलिस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक पंकज कांबळे, पोलीस कर्मचारी अक्षय देशमुख ,अंकुश मोरे,राधेश्याम पटेल, रफीक शेख व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news