अकोला मनपाचा पदभार जिल्हाधिकार्यांकडे?
जंपीग वाले हाजिर हो….
अकोला:- आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांची दि. 23 फेब्रुवारी रोजी पुणे येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.नविन आयुक्त कोण असा प्रश्न सर्व नागरिकांना व कर्मच्यारांना पडला होता अद्याप कुठल्याही आयुक्तांची नियुक्ती न झाल्यामुळे मनपा आयुक्त यांचा पदभार मा.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या कडे देण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.?
उद्या जिल्हाधिकारी मनपा अधिकार्यांची आढावा बैठक घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही बैठक मनपा आयुक्त कार्यालयात घेणार असुन त्यामध्ये करवसुलीचा कंत्राट, अतिक्रमण, परवाना विभाग, नगररचना, बांधकाम, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, तसेच विविध विभागाचा आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. पहिल्यांदा जिल्हाधिकारी आढावा घेणार असल्यामुळे मनपातील जंपीग पदोन्नती घेणा-र्यां अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.