देगाव येथे प्रेम संबंधातून युवकाची कुन्हाडीने हत्या!
आरोपी प्रेमानंद विनोद शिरसाट याला अटक!
अकोला: बाळापुर तालुका अंतर्गत येणाऱ्या देगाव येथे बुधवारी रात्री बारामती रहिवासी रोहित अजित भंडारकर नामक युवकाची कुन्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या घटने नंतर गंभीर जखमी अजित याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
या ठिकाणी त्याचा उपचार सुरू होता परंतु प्रकृती अधिक गंभीर झाल्यामुळे रोहित अजित भंडारकर याचा आज गुरुवारी सकाळी दरम्यान मृत्यू झाला. या घटनेत बाळापुर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपी प्रेमानंद शिरसाट याला अटक केली असून त्याच्या विरोधात सुरुवातीला कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता परंतु जखमी युवकाचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला गुरुवारी बाळापुर न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती रहिवाशी रोहित अजित भंडारकर व देगाव येथील रहिवासी एका महिलेचे पुणे येथे असताना प्रेम संबंध जुळले. त्यामुळे हे दोघेही पुणे येथे लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होते. परंतु गेल्या सहा महिन्यापासून सदर महिला पुणे येथून आपल्या माहेरी देगाव येथे आली असता या दोघांचे संबंध तूटले त्यामुळे रोहित मुलीचा शोध घेत बाळापूर येथे आला त्याने माहिती घेतल्यानंतर तो बुधवारी देगाव येथे पोहोचला यावेळी मुलीचा भाऊ प्रेमानंद शिरसाट व रोहित मध्ये कडाक्याचे भांडण झाले यादरम्यान प्रेमानंद ने रोहित वर कुराडीने प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात रोहित भंडारकर गंभीर रित्या जखमी झाला. या घटनेची माहिती बाळापुर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने रोहित भंडारकर याला उपचाराकरिता अकोला सर्वपचार रुग्णालयात भारती केले. गुरुवारी सकाळी उपचार दरम्यान रोहित भंडारकर याचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी प्रेमानंद विनोद शिरसाट याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध कलम ३०७,३०२ नुसार बाळापुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुढील कारवाई बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय पंकज कांबळे व कर्मचारी करीत आहे.