कारचा अपघात; तीन जण जखमी!
बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनाळा रोड बायपास नजीक कारचा अपघात; तीन प्रवासी जखमी झाले,ही घटना गुरुवारी सकाळी दरम्यान घडली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एम एच २९ बी सी ३७५१ या कार मधून चार प्रवासी जात होते,सदर कारचा अपघातात तिन जण जखमी झाले,तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, दरम्यान अपघात कसा झाला, जखमी कोण हे मात्र वृत्त लिहिस्तोर समजू शकले नाही, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे यांच्या सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहेत