लांडग्याने गोठ्यातील चार शेळ्या केल्या फस्त!
बोरगावातील घटना, ग्रामस्था मध्ये भितीचे वातावरण!
बोरगाव मंजू – स्थानिक रामजी नगरातील गोठ्यातील बांधलेल्या चार शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली,यात चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, सुदैवाने घरातील कुटुंब बाहेर गावी असल्याने मोठी घटना टळली,
प्राप्त माहितीनुसार बोरगाव मंजू येथील रामजी नगर स्थित ज्ञानेश्वर वरघट हे आपल्या कुटुंबासह रहातात, ते भुमिहिन असल्याने मिळेल तो रोजगार करून कृटृंबाचा उदरनिर्वाह चालवतात, मजुरी करून पैसा जमा करून काही दिवसांपूर्वी शेळ्या खरेदी केल्या होत्या, दरम्यान बुधवारी रात्री त्यांना दवाखान्याचे काम असल्याने ते नेहमी प्रमाणे गोठ्यात शेळ्या बांधुन बाहेर गावी गेले होते , दरम्यान बुधवारी मध्यरात्री लांडग्यांनी मानवी वस्तीत येऊन गोठ्यातील बांधलेल्या चार शेळ्या फस्त केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली, सदर घटनेने मोल मजुरी करणारे ज्ञानेश्वर वरघट यांच्या वर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे, त्यांचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, सुदैवाने घरातील कुटुंब बाहेर गावी गेले होते, त्यामुळे मोठी घटना टळली, दरम्यान घटनेची माहिती वनविभागाचे जुनघरे यांना दिली वरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी मृत शेळ्यांचा पंचनामा केला, सदर घटनेची दखल घेऊन संबंधित विभागाने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे