क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार..


शिवसेना (उबाठा )शहर प्रमुख निरंजन बंड यांचा पुढाकार…

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा

पातुर ‌:: येथील मुख्य संभाजी चौकात असलेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पातुर शहरातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या पातुर तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचे सत्कार समारंभाचे आयोजन पातूर शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख निरंजन बंड व पदाधिकारी याच्या संकल्पनेतून करण्यात आले… कार्यक्रमाचे अध्यक्ष न प चे माजी उपाध्यक्ष परशराम उंबरकार हे होते तर जिल्हा पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सतिश सरोदे, उपाध्यक्ष, किरण कुमार निमकंडे, सचिव संगिता ताई इंगळे, सह सचिव सैय्यद साजिद सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महिलांना शिक्षणाचे द्वार खुले करून देणाऱ्या आणि थोर समाज सेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवराचे हस्ते पूजन करण्यात आले.
व पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सतीश सरोदे उपाध्यक्ष किरण कुमार निमकंडे, सचिव संगीताताई इंगळे, सहसचिव साजिद हुसेन याच्या सह नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचे महत्त्व सांगत महिला पत्रकार संगीता ताई इंगळे यांनी मत व्यक्त करताना ,आज सावित्रीबाई फुले यांच्या कायाऀ मुळे मी पत्रकार बनली आणि समाजाला खरे न्याय द्यायचे कार्य माझ्या पत्रकारीतुन घडत आहे अशा शब्दांत त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. तर पत्रकार संघाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सतीश सरोदे,उपाध्यक्ष किरण कुमार निमकंडे,सहसचिव सय्यद साजिद सर यांनी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप काळपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर कढोणे यांनी केले या वेळी मराठी पत्रकार संघाचे माजी पातुर तालुका अध्यक्ष पत्रकार कुदूस शेख , प्रदिप काळपांडे,निखिल इंगळे,शेगोकार सर , प्रमोद कढोणे, यांच्या सह शिवसेना उबाठा पक्षाचे,शंकर देशमुख, सागर कढोणे, कैलास बगाडे, विशाल तेजवाल,अजय पाटील, दिपक देवकर,सचिन गिरे, गणेश पाटील, महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष. सुरेद्र उगले, मोहन गाडगे, आनंद तायडे,रवि काकड, रवि शंकर राखोंडे यांच्या सह सावित्री च्या लेकी यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news