पिंजर नजीक दोन ट्रकचा अपघातातील !
मुर्तीजापुर- पिंजर ते कारंजा रोडवरील पिंजर नजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन ट्रक चालक कॅबीन मधे फसलेला होता या अपघाताची माहीती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या सहकाऱ्यांसह क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी आणी रुग्णावाहीका घेऊन अवघ्या दहा मिनटात घटना स्थळी पोहचले तेव्हा ट्रकच्या कॅबीन मधे गंभीर जखमी अवस्थेत चालक फसलेला दिसून आला यावेळी घटनास्थळावर असलेले पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे सर यांच्या आदेशाने त्या चालकाला मोठ्या शिथाफीने बाहेर काढून प्रथमोपचार देऊन लगेचच पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथील डाॅक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले लगेचच पथकाच्या रुग्णवाहीकेने पथकाचे जवान अंकुश सदाफळे,मयुर सळेदार,महेश साबळे हे घेऊन गेले डोक्याला गंभीर दुखापत असल्याने काहीकेल्या रक्तस्त्राव बंद होत नव्हता काॅटन पॅड सह बॅण्डेज करत शेवटी अकोला रुग्णालय गाठलेच आता उपचार चालु आहेत… कंटेनर एक मोठा ट्रक समोरासमोर भिडल्याने ठाणेदार गंगाधर दराडे सर एएसआय नागोराव बेलुरकार हे.काॅ.नागेश दंदी आणी पिंजर पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोहन इंगळे,निखील चांदुरकर, पथकाच्या जवानांनी रोड सुरळीत करुन वाहतुक मोकळी केली…