रस्त्यावर वेगाची जीवघेणी स्पर्धा ;वाहनचालकांनी ओलांडली वेगमर्यादा

रस्त्यावर वेगाची जीवघेणी स्पर्धा ;वाहनचालकांनी ओलांडली वेगमर्यादा

भरधाव ट्रकची दुचाकीस्वाराला जब्बर धडक;दुचाकीस्वार जागीच ठार

अकोला प्रतिनिधी:

मुर्तीजापुर :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ फोर लेन सुसाट झाल्याने वाहन चालकांनी ओलांडली ६० ची मर्यादा वेगमर्यादेवर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेय.. त्यामुळेचं मुर्तीजापुर ते माना कुरूम दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र थांबता थांबेना. त्यात पुन्हा हेंडज जवळ दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत रामटेक येथील युवा शेतकरी घटनास्थळी ठार झाल्याची घटना १३ मार्च च्या रात्री ९ः३० च्या दरम्यान घडली.

 

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की राजकुमार देविदास कोकाटे वय ४० रा.रामटेक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ उमेश देविदास कोकाटे हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० एवाय ०९४२ ने मूर्तिजापूर येथे हरभरा विक्री करून १३ मार्चला रात्री ९ः३० च्यादरम्यान रामटेक कडे जात असताना हेंडज जवळ पेट्रोल पंपासमोर ट्रक क्रमांक यूपी ६३ एटी ४३५९ च्या चालकाने भरधाव निष्काळजीपणे वाहन चालवून मोटरसायकल चालकास जबर धडक दिली.धडक एवढी जबरदस्त होती की मोटरसायकल चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातग्रस्त ट्रक चालक घेऊन पसार झाला असता, मुर्तीजापुर शहर व ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून काटेपूर्णा टोल नाक्याजवळ पकडला.सदर अपघातात मोटर सायकल चालक हा घटनास्थळी ठार झाल्याच्या फिर्यादीवरून ट्रक चालक एमुल हसन नजमूल हसन रा.पवारपुरा जि.प्रतापगड युपी याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम २७९,३०४ ‘अ’ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल विजय मानकर, पोलीस कॉन्स्टेबल सुदाम धूलगुंडे करीत आहे.वेगाने चालणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करावी असे जनसामान्यातून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news