अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; तसेच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक जिल्हाधिका-यांची पत्र-परिषद

अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; तसेच अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक जिल्हाधिका-यांची पत्र-परिषद

अकोला, दि. 17 : 06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता सार्वत्रिक निवडणूक व 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता पोट निवडणूक घेण्‍यात येणार असून, सर्व मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्‍यामध्‍ये आपले अमूल्‍य योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
निवडणूकीसंबंधी नियोजनभवनात पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिका-यांनी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव व डॉ. शरद जावळे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहे.
सदर निवडणूक कार्यक्रमांतर्गत 06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता सार्वत्रिक निवडणूक व 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. मा.भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र. कार्यक्रमाचे टप्‍पे दिनांक
1 निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करणे व नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक दिनांक 28/03/2024 (गुरुवार)
2 नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 04/04/2024 (गुरुवार)
3 ना‍मनिर्देशनपत्र छाननी करण्‍याचा दिनांक दिनांक 05/04/2024 (शुक्रवार)
4 उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक दिनांक 08/04/2024 (सोमवार)
5 मतदानाचा दिनांक दिनांक 26/04/2024 (शुक्रवार)
6 मतमोजणीचा दिनांक दिनांक 04/06/2024 (मंगळवार)
7 निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्‍याचा दिनांक दिनांक 06/06/2024 (गुरुवार)

 अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिलः
1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र. मतदार संघ
क्रमांक व नांव मतदार संख्‍या
पुरुष स्‍त्री इतर एकूण
1 28-अकोट 156818 142208 3 299029
2 29-बाळापुर 154843 143396 4 298243
3 30-अकोला (पश्चिम) 165843 162212 21 328076
4 31-अकोला (पुर्व) 174008 164521 15 338544
5 32-मुर्तिजापुर (अ.जा.) 154474 143698 6 298178
6 33-रिसोड 164677 148889 1 313567
एकूण…. 970663 904924 50 1875637
निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमामध्‍ये प्राप्‍त होणा-या अर्जांवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍याच्‍या शेवटच्‍या दिनांकापर्यंत निर्णय घेऊन अंतिम मतदार संख्‍या निश्चित करण्‍यात येते. त्‍याबाबत आपणास अवगत करण्‍यात येईल.
 18 ते 19 वयोगटातील मतदारांचा तपशिलः
मा.भारत निवडणूक आयोगाकडून पात्र तरुण व नव मतदारांच्‍या नाव नोंदणीबाबत विशेष भर देण्‍यात येत असून मतदार यादीमध्‍ये आज रोजी 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांचा मतदार संघनिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र. मतदार संघ
क्रमांक व नांव मतदार संख्‍या
पुरुष स्‍त्री इतर एकूण
1 28-अकोट 2466 1384 0 3850
2 29-बाळापुर 2797 1806 0 4603
3 30-अकोला (पश्चिम) 1884 1566 0 3450
4 31-अकोला (पुर्व) 2248 1488 0 3736
5 32-मुर्तिजापुर (अ.जा.) 2953 2040 1 4994
6 33-रिसोड 3275 2055 0 5330
एकूण…. 15623 10339 1 25963

 06-अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये एकुण 2056 मतदान केंद्रे असून त्‍यांचा मतदार संघनिहाय तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र. विधानसभा मतदारसंघ एकुण मतदान केंद्रांची संख्या

1 28 – अकोट वि.स.म.सं. 336
2 29 – बाळापुर वि.स.म.सं. 340
3 30 – अकोला पश्चिम वि.स.म.सं. 307
4 31 – अकोला पूर्व वि.स.म.सं. 351
5 32 – मुर्तिजापूर (अजा) वि.स.म.सं. 385
6 33 – रिसोड वि.स.म.सं. 337
एकूण 2056

मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार सर्वच मतदान केंद्रांवर आवश्‍यक त्‍या सुविधा (AMF) उपलब्‍ध करुन घेण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे दिव्‍यांग मतदारांना सुलभतेने मतदानाचा अधिकार बजावता येण्‍यासाठी (Accessible Elections) साठी आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे प्रत्‍येक मतदान केंद्रावर पिण्‍याच्‍या पाण्‍याची तसेच रॅम्‍प व सावलीसाठी आवश्‍यक त्‍या सोईसुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत.

 

 

 उमेदवाराचे वयः उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी नसावे.

 अनामत रकमेबाबतः

लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम, 1951 चे कलम 34 नुसार लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूकीकरीता अनामत रक्‍कम खालीलप्रमाणे भरणा करणे अनिवार्य आहे-

लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता अ.जा./अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांकरीता सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता अ.जा./अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांकरीता
25,000/-
(रुपये पंचवीस हजार) 12,500/-
(रुपये बारा हजार पाचशे) 10,000/-
(रुपये दहा हजार) 5,000/-
(रुपये पाच हजार पाचशे)

वरीलप्रमाणे अनामत रक्‍कम ही रोख स्‍वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावी अथवा सदर अनामत रक्‍कम “8443-CIVIL DEPOSITS-121-DEPOSITS IN CONNECTION WITH ELECTIONS-2- DEPOSITS MADE BY CANDIDATES FOR PARLIAMENT.” या लेखाशिर्षाखाली बॅंकेमार्फत चलान व्‍दारे भरणा करता येईल. चलान व्‍दारे भरणा केलेल्‍या अनामत रक्‍कमेचे चलान नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

 निवडणूक खर्च मर्यादाः
मा.भारत निवडणूक आयोगाकडील क्रमांकःECI/PN/02/2022 दिनांक 06 जून 2023 अन्‍वये उमेदवाराला लोकसभा निवडणूकीसाठी खर्च मर्यादा ही रक्‍कम रुपये 95,00,000/- (रुपये पंच्‍यान्‍नव लाख) इतकी वाढविण्‍यात आलेली आहे. जी मागील निवडणूकीचे वेळी 70,00,000/- (रुपये सत्‍तर लाख) इतकी होती.
त्‍याचप्रमाणे वरील पत्रानुसार विधानसभा निवडणूकीकरीता खर्च मर्यादा ही रक्‍कम रुपये 40,00,000/- (रुपये चाळीस लाख) इतकी वाढविण्‍यात आलेली आहे. जी मागील निवडणूकीचे वेळी रक्‍कम रुपये 28,00,000/- (रुपये अठ्ठावीस लाख) इतकी होती.

 आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील संभाव्‍य उमेदवारांनी निवडणूकांच्‍या खर्चाकरीता स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणेबाबत
मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः76/INSTRUCTION/2024/EEPS/ Vol.IV दिनांक 15 ऑक्‍टोबर 2023 रोजीच्‍या पत्रान्‍वये आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने संभाव्‍य उमेदवारांची निवडणूकांच्‍या खर्चाकरीता उमेदवारी अर्ज भरण्‍यापूर्वी किमान एक दिवस अगोदर स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणे बंधनकारक असल्‍याबाबत तसेच उमेदवार व प्रतिनिधी यांचे संयुक्‍त खाते चालत असल्‍याबाबत सर्व उपस्थितांना अवगत करुन देण्‍यात आले. याकरीता संबंधीत उमेदवारांना आवश्‍यक सहकार्य करण्‍याबाबत, त्‍वरीत धनादेश पुस्‍तीका (Cheque Books) निर्गमीत करण्‍याबाबत त्‍याचप्रमाणे स्‍वतंत्र काऊंटर सुरु करुन निवडणूक कालावधीमध्‍ये सदर उमेदवारांना रक्‍कमा जमा करणे व काढणेकरीता प्राधान्‍य देण्‍याबाबत जिल्‍ह्यातील सर्व बॅंकांना जिल्‍हा अग्रणी बॅंक अकोला यांचेमार्फत या कार्यालयाकडून पत्र निर्गमीत करण्‍यात आलेले आहे.

 कोरे नामनिर्देशनपत्र वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाणः

1 कोरे नामनिर्देशनपत्र वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाण जिल्‍हाधिकारी अकोला यांचे दालन, नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

 SPECIFIED ARO: श्री.डॉ.शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, अकोला

 अकोला जिल्‍हयातील 06-अकोला लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे-

अ.क्र. लोकसभा मतदारसंघाचे नांव निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव
1 06-अकोला लोकसभा मतदार संघ श्री.अजित कुंभार (भा.प्र.से.)
जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अकोला

अ.क्र. विधानसभा मतदार संघ
क्रमांक व नांव सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
यांचे नांव
1 28-अकोट वि.स.म.सं. श्री.मनोज लोणारकर,
उप विभागीय अधिकारी अकोट तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
2 29-बाळापुर वि.स.म.सं. श्री.अनिरुध्‍द बक्षी,
उप विभागीय अधिकारी बाळापूर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
3 30-अकोला पश्चिम वि.स.म.सं. श्रीमती अनिता भालेराव,
उप जिल्‍हाधिकारी (महसूल) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
4 31-अकोला पूर्व वि.स.म.सं. श्री.डॉ.शरद जावळे,
उप विभागीय अधिकारी अकोला तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

5 32-मुर्तिजापूर (अजा) वि.स.म.सं. श्री.संदिपकुमार अपार,
उप विभागीय अधिकारी मुर्तिजापूर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
6 33-रिसोड वि.स.म.सं. श्रीमती वैशाली देवकर,
उप विभागीय अधिकारी वाशिम तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

 06-अकोला लोकसभा मतदार संघाचे निवडणूकीची निवडणूक विषयक कामे व्‍यवस्थितरित्‍या व कालमर्यादेत पार पाडण्‍याकरीता विविध समित्‍या गठीत करुन त्‍या करीता नोडल अधिकारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ.क्र. विषय नोडल अधिकारी यांचे नाव व पदनाम
1 स्विप समिती (SVEEP Committee) मा. श्रीमती वैष्‍णवी बी. (भा.प्र.से.)
मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला
2 District Grievence Committee for Seizure and release of cash and other items मा. श्रीमती वैष्‍णवी बी. (भा.प्र.से.)
मुख्‍य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला
3 आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती (Implementing MCC) श्री रामदास सिध्‍दभट्टी,
अपर जिल्‍हाधिकारी अकोला
4 कर्मचारी व्‍यवस्‍थापन समिती (Manpower Management) श्री विजय पाटील, उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. प्र. निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला
5 प्रशिक्षण व्‍यवस्‍थापन समिती
(Training Management Committee) श्री विजय पाटील, उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. प्र. निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला
6 वाहतूक व्‍यवस्‍थापन समिती
(Transport Management Committee ) श्री विजय पाटील, उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. प्र. निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला
7 कायदा व सुव्‍यवस्‍था
(Law & Order, VM, District Security Plan Committee ) श्री विजय पाटील, उपजिल्‍हाधिकारी, रो.ह.यो. प्र. निवासी उपजिल्‍हाधिकारी अकोला
8 निवडणूक साहित्‍य समिती
(Material Management Committee ) श्री अनिल माचेवाड, उपजिल्‍हाधिकारी, भुसंपादन (RPKV) अकोला
9 इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचे व्‍यवस्‍थापन
(EVM Management Committee ) डॉ.श्री.शरद जावळे, नोडल अधिकारी ईव्‍हीएम तथा उपविभागीय अधिकारी अकोला
10 उमेदवार यांचे खर्च विषयक व्‍यवस्‍थापन (Expenditure Management Committee) श्री योगेश धोंगडे उप.मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी, जि.प. अकोला
11 टपाली मतपत्रिका, सर्व्‍हीस वोटर
ETPBS & Postal Ballot Paper Committee श्री.रामदास सिध्‍दभट्टी,
अपर जिल्‍हाधिकारी अकोला
12 प्रसार माध्‍यम व संदेशवहन समिती
Media & Communication Monitoring Committee (MCMC) श्री हर्षवर्धन पवार,
जिल्‍हा माहिती अधिकारी, अकोला
13 मतपत्रिका समिती व मतदार यादी
Ballot Paper Committee श्री अनिल माचेवाड, उपजिल्‍हाधिकारी, भुसंपादन (RPKV )अकोला
14 24 x 7 जिल्‍हा नियंत्रण मदत व तक्रार निवारण कक्ष 1950 24 X 7 District Contact Centre Help desk & Grevience Centre 1950 श्री अनिल माचेवाड,उपजिल्‍हाधिकारी, भुसंपादन (RPKV )अकोला

अ.क्र. विषय नोडल अधिकारी यांचे नाव व पदनाम
15 दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी मदत कक्ष व त्‍यांना सोई सुविधा पुरवणेबाबत PWD Accessibility Committee श्रीमती मंगला मून,
सहा. आयुक्‍त समाजकल्‍याण,अकोला
16 C-VIGIL, तांत्रीक कक्ष Technical Section श्री अनिल चिंचोले, डिआयओ एनआयसी अकोला
17 निवडणूक निरिक्षकांचे व्‍यवस्‍थापन
Observer Management Committee श्री शंकर किरवे, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी,अकोला

 06-Facilitation Center for Postal Ballot:

निवडणूक कर्तव्‍यावर असणा-या अधिकारी/कर्मचारी यांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा याकरीता मतदार संघनिहाय सुविधा केंद्र स्‍थापन करण्‍यात आले आहे. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

अ.क्र. मतदार संघ क्रमांक व नांव नोडल अधिकारी नांव व पदनाम ठिकाण
1 28 – अकोट वि.स.म.सं. श्री.शंकर श्रीराव, नायब तहसिलदार (सं.गा.यो.) तहसिल कार्यालय, अकोट संजय गांधी विभाग,
तहसिल कार्यालय, अकोला
2 29 – बाळापुर वि.स.म.सं. श्री.वैभव फरतारे,
तहसिलदार बाळापूर नायब तहसिलदार (महसूल) यांचा कक्ष, तहसिल कार्यालय बाळापूर
3 30 – अकोला पश्चिम वि.स.म.सं. श्री.रतनसिंग पवार,
गटशिक्षणाधिकारी प्राथ. अकोला नवीन प्रशासकीय इमारत, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला
4 31 – अकोला पूर्व वि.स.म.सं. श्री.पंकज पवार, उपअधिक्षक भूमी अभिलेख अकोला जिल्‍हा सांख्यिकी कार्यालय, अकोला
5 32 – मुर्तिजापूर (अजा) वि.स.म.सं. श्रीमती हर्षदा खेडकर, नि.ना.तह., बार्शिटाकळी तहसिल कार्यालय, मुर्तिजापूर
6 33 – रिसोड वि.स.म.सं. कु.प्रतिक्षा तेजनकर, तहसिलदार रिसोड तहसिल कार्यालय, रिसोड

 06-अकोला लोकसभा मतदार संघाकरीता अकोला जिल्‍ह्याअंतर्गत आचार संहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीकरीता मतदार संघ स्‍तरावर खालीलप्रमाणे FST/SST/VST/VVT इत्‍यादी पथके नियुक्‍त करण्‍यात आली आहेत त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

FST SST VST VVT Accounting MCC परवानगी कक्ष
पथकांची संख्‍या चेकपोस्‍ट संख्‍या पथकांची संख्‍या पथकांची संख्‍या पथकांची संख्‍या पथकांची संख्‍या पथकांची संख्‍या पथकांची संख्‍या
30 17 53 17 7 8 8 8

 06-अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये महिला, युवा, दिव्‍यांग अधिकारी व कर्मचारी यांचे व्‍दारे संचलित करण्‍यात येणा-या मतदान केंद्राची माहिती खालील प्रमाणे आहे-

अ.क्र. विधानसभा मतदारसंघाचे नांव महिला संचलीत मतदान केंद्राची संख्‍या युवा संचलीत मतदान केंद्राची संख्‍या दिव्‍यांग संचलीत मतदान केंद्राची संख्‍या
1 28-अकोट वि.स.म.सं. 1 1 1
2 29-बाळापुर वि.स.म.सं. 1 1 1
3 30-अकोला पश्चिम वि.स.म.सं. 2 2 1
4 31-अकोला पूर्व वि.स.म.सं. 1 1 1
5 32-मुर्तिजापूर (अजा) वि.स.म.सं. 1 1 1
6 33-रिसोड वि.स.म.सं. 1 1 1
एकुण 7
7
6

 06-अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये परदानशिन मतदान केंद्राची संख्‍या खालील प्रमाणे आहे-

अ.क्र. विधानसभा मतदारसंघाचे नांव मतदान केंद्राची संख्‍या
1 28 अकोट वि.स.म.सं. 121
2 29 बाळापुर वि.स.म.सं. 149
3 30 अकोला पश्चिम वि.स.म.सं. 180
4 31 अकोला पूर्व वि.स.म.सं. 79
5 32 मुर्तिजापूर (अ.जा.) वि.स.म.सं. 183
6 33 रिसोड वि.स.म.सं. 60
एकुण 772

 06-अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये एकुण 2056 मतदान केंद्र राहणार असून सदर मतदान केंद्राकरिता विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्‍त सेक्‍टर/झोनल अधिकारी यांची संख्‍या खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. विधानसभा मतदार संघाचे नांव नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या
झोनल अधिकारी यांची संख्‍या
1 28- अकोट वि.स.म.सं. 24
2 29- बाळापुर वि.स.म.सं. 28
3 30- अकोला पश्चिम वि.स.म.सं. 28
4 31- अकोल पूर्व वि.स.म.सं. 33
5 32- मुर्तिजापुर (अ.जा.) वि.स.म.सं. 40
6 33- रिसोड वि.स.म.सं. 30
एकुण 183

 06-अकोला लोकसभा मतदार संघामध्‍ये अकोला जिल्‍ह्यातील मतदार संघासाठी मतदाना करीता लागणारे अधिकारी, कर्मचारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर केंद्राध्‍यक्ष-1 व मतदान अधिकारी-3 तसेच मतदारांना मदत करण्‍यासाठी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे-

अ.क्र. केंद्राध्‍यक्ष यांची संख्‍या मतदान अधिकारी
क्रमांक.1 मतदान अधिकारी
क्रमांक.2 मतदान अधिकारी
क्रमांक.3 परदानशीन मतदान केंद्रावर महिला कर्मचारी यांची संख्‍या मतदान केंद्र स्‍तरीय अधिकारी आरोग्‍य कर्मचारी एकूण
1 2502 3102 3136 3136 772 2056 2056 16760

 अकोला जिल्‍ह्यामध्‍ये उपलब्‍ध मतदान यंत्र व व्‍हीव्‍हीपॅट ची माहिती (FLC OK):

अ.क्र. मतदान यंत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघ पोट निवडणूकीकरीता
1 बॅलेट युनिटांची संख्‍या (BUs) 4134 620
2 कंट्रोल युनिटांची संख्‍या (CUs) 2346 620
3 व्‍ही व्‍ही पॅटची संख्‍या (VVPATs) 2503 620

 आवश्‍यक वाहनांची संख्‍या:
अकोला जिल्‍ह्यातील मतदान पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचविणे व मुख्‍यालयी परत आणणेकरीता आवश्‍यक वाहनांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-
बस मिनीबस जीप एकूण
198 34 199 431
 06-अकोला लोकसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्‍यानंतर मतदान केंद्रावर वापरण्‍यात आलेले मतदान यंत्र (EVM / VVPAT ठेवण्‍याकरीता जिल्‍हास्‍तरावरील सुरक्षा कक्ष व मतमोजणी ठिकाणाचा तपशील-
06-अकोला लोकसभा मतदार संघ व
30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता निश्चित सुरक्षा कक्ष व मतमोजणीचे ठिकाण महाराष्‍ट्र वखार महामंडळ गोदाम,
एमआयडीसी फेज-4, कुंभारी रोड, शिवणी, अकोला

 06-अकोला लोकसभा मतदार मतदार संघाचे निवडणूकीकरीता मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्‍यानंतर मतदान केंद्रावर वापरण्‍यात आलेले मतदान यंत्र (EVM/ VVPAT) तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात ठेवण्‍याकरीता सहायक निवडणूक अधिकारी यांचे स्‍तरावर सुरक्षा कक्ष निश्चित करण्‍यात आलेले आहेत.

 मतदान पथकांना मतदान साहित्‍य वाटप करणे व मतदान झाल्‍यानंतर मतदान पथकांकडून साहित्‍य स्विकारुन संबंधीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सदर मतदान नोंदविलेली मतदान यंत्रे व अन्‍य साहित्‍य महाराष्‍ट्र वखार महामंडळ गोदाम, एमआयडीसी फेज-4, कुंभारी रोड, शिवणी, अकोला येथील सुरक्षा कक्षामध्‍ये उचीत सुरक्षा बंदोबस्‍तामध्‍ये ठेवण्‍यात येणार आहेत.

 06-अकोला लोकसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता जिल्‍हा स्‍तरावर नागरिकांना टोल फ्री असलेला 1950 हा दुरध्वनी क्रमांक निवडणूक विषयक कोणतीही तक्रार नोंदविण्या करिता किंवा माहिती विचारण्या करिता कार्यान्वित करण्यात आला आहे तसेच तालुकास्‍तरावर सुध्‍दा तक्रार निवारण कक्षाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे (जिल्‍हा संपर्क कक्ष –DCC)
वि.स.म.सं. नांव दुरध्‍वनी क्रमांक
जिल्‍हा कार्यालय 1950 व 0724-2428200
28 – अकोट वि.स.म.सं. 9422085950
29 – बाळापूर वि.स.म.सं. 9096148782
30 – अकोला पश्चिम वि.स.म.सं. 0724–2404225
31 – अकोला पुर्व वि.स.म.सं. 0724-2435336
32 – मुर्तिजापूर वि.स.म.सं. 07256-243473
33 – रिसोड वि.स.म.सं. 07251-222316

भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीत घडणा-या गैरप्रकारावर आळा घालण्याकरिता व नागरीकांचे सुविधे करिता C-Vigil Application तयार केला असून सदर Application व्दारे कोणत्याही नागरीकास अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास सदर Application व्दारे व्हिडीओ किंवा फोटो अॅप व्दारे अपलोड करून तक्रार नोंदविता येईल व अश्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येईल.
आचारसंहीतेच्या कालावधित राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे व काय करु नये या बाबतची सविस्तर माहिती राजकीय पक्षांसोबत आयोजित सभेत देण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे राजकीय पदाधिकारी यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे बाबत संबंधितांना पत्राव्दारे निर्देश देण्यात आले आहेत.
 PwDs आणि 85 पेक्षा अधिक वयाच्‍या मतदारांना Home Voting च्‍या सूविधेबाबत-
मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः3/4/2022/SDR/Vol.II दिनांक 11 सप्‍टेंबर 2023 रोजीच्‍या पत्रान्‍वये निवडणूक नियम 1961 मधील कलम 27A नुसार ज्‍या मतदाराची 40% पेक्षा अधिक अपंगत्‍व असल्‍यामुळे मतदार यादीमध्‍ये दिव्‍यांग म्‍हणून नोंद करण्‍यात आलेली आहे तसेच ज्‍या व्‍यक्‍तीला बेंचमार्क अपंगत्‍व आलेले आहे अशा मतदारांना अपंगत्‍व प्रमाणपत्र सादर करुन त्‍याचप्रमाणे 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले असे मतदार जे मतदान केंद्रापर्यंत स्‍वतः जावू शकत नाही अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची / Home Voting ची सुवीधा मा.भारत निवडणूक आयोगाने उपलब्‍ध करुन दिलेली आहे. त्‍याकरीता अशा मतदारांनी आवश्‍यक ते प्रमाणपत्र/दाखला सह विकल्‍प देणे बंधनकारक आहे.
अकोला जिल्‍ह्यातील PwD मतदार व 80+ मतदारांची संख्‍या खालीलप्रमाणे आहे.

85+ मतदारांची संख्‍याः Pwd मतदारांची संख्‍याः
16488 12045

 SVEEP Activity बाबत ः
मतदारांमध्‍ये मतदान करण्‍याबाबत जागृतीसाठी जिल्‍हा स्‍तरावर तसेच सर्व विधानसभा मतदार संघांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर SVEEP Activity करण्‍यात येत आहेत.

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news