लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणे आवश्यक – संदिपकुमार अपार

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणे आवश्यक – संदिपकुमार अपार

निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर ईएसएमएस अॅपची नजर

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

योग्य पद्धतीने कारभार चालवण्यासाठी लोकशाही कायम जिवंत राहावी यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिनांक १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केले.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या अनुषंगाने देशात सर्व ठिकाणी आचारसंहिता ही लागू करण्यात आली असल्याकारणाने दिनांक १६ मार्च रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील लोकशाही कायम जिवंत राहण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे गरजेचे आहे लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती त्येकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या कार्यालयातआयोजित पत्रकार परिषदेत दिली.पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप‌कुमार अपार म्हणाले की, संपूर्ण मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश असणाऱ्या मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात एक लाख ५५ हजार ७३ पुरुष, एक लाख ४४ हजार ४७४ महिला व पाच तृतीयपंथी मतदारांसह एकूण दोन लाख ९९ हजार ५५२ मतदार या तालुक्यातील १९४, बार्शीटाकळी तालुक्यातील १५४ व अकोला तालुक्यातील ३७ मतदान केंद्रांवर येणाऱ्या २६ एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील. ८५ वयापेक्षा अधिक वयाच्या मतदारांना १२ डी अर्ज भरून घेऊन घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली असून, यासह स्वतंत्र युवा मतदान केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र हे या निवडणूकीचे वैशिष्ट्य असेल. आजपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने पथक स्थापन करण्यात आले आहे व उपविभागीय अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. २४ तास सुरु असणाऱ्या या नियंत्रण कक्षात ०७२५६-२४३४७३ या दूरध्वानी क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चार भरारी पथके, विडगाव, कुरूम व कासमार या तीन ठिकाणी चेक पोस्ट तसेच उमेदवारांच्या प्रचारावरा नियंत्रण ठेवण्यासाठी तीन व्हीएसटी पथके नियुक्त करण्यात आले असून विविध परवानग्यासाठी एक खिडकी योजना सुविधा चालू करण्यात आले असूननिवडणूक कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या अवैध दारू ,पैसा वाटप यासारख्या गैरप्रकारावर शंभर मिनिटात कारवाई होण्यासाठीचे ईएसएमएस अॅप असल्याचेही संदीपकुमार अपार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला तहसीलदार शिल्पा बोबडे, बार्शिटाकळीचे तहसीलदार राज वझिरे,नायब तहसीलदार उमेश बनसोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news