अकोल्यात भाजपाच्या प्रचाराला सुरुवात, राज राजेश्वर येथे दर्शन घेऊन अनुप धोत्रे यांनी फोडले नारळ
एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय..मात्र अकोल्यात भाजप तर्फे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रेला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेय…अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहेय..
उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्याने भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी जनसंपर्काला सुरुवात केली आहेय..अनुप धोत्रे यांनी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाला आपल्या आई, पत्नी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत जलाभिषेक आणि आरती करून निवडणुकीला सुरुवात केलीय.. नारळ फोडून दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.