ब्रेकिंग*……
विहिरीत पडलेल्या युवकाला पिंजर येथील मानव आपत्कालीन पधकाने शोधुन काढले बाहेर
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीमची धाडसी यशस्वी पराकाष्ठा
▶️ अकोला येथील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मलकापूर येवता रोडवरील नजिकच्या शेतातील विहिरीत एक युवक पडला असल्याची माहीती खदान पोलीस ठाण्यात पो.नि.धनंजय सायरे साहेब यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना देऊन सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, ऋषिकेश राखोंडे,छोटु ठाकरे,संकेत देशमुख आणी शोधव बचाव साहित्य घेऊन आपात्कालीन वाहणासह एका तासात घटनास्थळावर पोहचले लगेच सिन ट्रेस केला असता 50 फुट खोल आणी 15 फुट पाणी असल्याचे निष्पन्न झाले लगेचच पाच राऊंड रॅम्प टाकुन सर्च ऑपरेशन चालु केले असता मोठ्या अथक प्रयत्नाने शेवटी आज 25 मार्च रोजी रात्री अंदाजे 8:30 वाजताच्या दरम्यान मृतदेह शोधून काढून बाहेर काढला यावेळी मृतकाचे नाव शुभम राजु गीते वय अं.(30) वर्ष राहणार हनुमान नगर मोठी उमरी ता.जी.अकोला येथील असल्याचे निष्पन्न झाले.* घटनास्थळावर मदती करीता अकोला अग्निशमन विभागाचे वाहन चालक अणील खीरोडकर,फायरमन
अविनाश सांगळे,फा.अमोल नागदेवते,फा.नारायण राऊत,यांच्यासह खदान पोलीस ठाण्याचे पो.नी. धनंजय सायरे साहेब, पिएसआय नरेंद्र पदमने साहेब,पो.काॅ.हे.काॅ.दिनकर धुरंधर साहेब,पोकाॅ.दिपक वार साहेब,पो.काॅ.आकाश राठोड साहेब,आणी नातेवाईकांसह मित्र मंडळी हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.