शनिची वक्रदृष्टी मनपा कर्मचाऱ्यांवर
तिन वर्षाचा पायंडा मनपात तुटला; मनपा कर्मचाऱ्यांचा पगाराकरिता आयुक्तांना घेराव!
अकोला :- गेल्या तिन वर्षापासून तत्कालीन आयुक्त निमा अरोरा आणी कविता व्दिवेदी यांच्या काळात मनपा अधिकारी कर्मचारी यांचे वेतन वेळेवर होत होते.मात्र आयुक्त सुनील लहाने यांनी मनपाचा कारभार हाती घेताच. ठेकेदारांची बिले काढण्याचा सपाटा लावला आहे. मनपा आयुक्त यांनी पदभार हाती घेताच आज दिनांक 1 एप्रिल रोजी वेतन होणार नाही अशी माहिती मनपा कर्मचाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वात वेतनासाठी आयुक्तांच्या कार्यालयात गेले असता करवसुली कमी झाल्याने उशीर होत असल्याचे आयुक्तांनी यावेळी संघटनेला अवगत केले.परंतु नव्याने रुजू झालेल्या आयुक्तांनी 1 तारखेला बैंक बंद असल्यामुळे या महिन्यात पगार उशिरा होणार असल्याने काही फरक पडणार नाही असे कर्मचारी संघटने कडे बोलून दाखवले.सविस्तर माहिती घेतली असता याआधी करवसुली हे मनपा कर्मचारी करत होते परंतु 8:49 टंक्के दराने वसुली स्वाती कंपणीला दिल्याने यावेळी वसुली कमी झाल्याने वेतनाची समस्या निर्माण झाली असल्याचे सुतोवाच केले.
मनपा कर्मचारी 60 टंक्के वसुली करुनही त्यांची इक्रिमेंट कापण्यात येत होते, मग स्वाती कंपणीने अंदाजे 30 टंक्के वसुली केली यावर आयुक्त काय कारवाही करतात की वसुली वाढविण्यासाठी नियोजन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहिती घेतली असता विद्यमान आयुक्त नांदेड येथे असतांना तीन तीन महिण्याचे वेतन थकित असल्याची माहिती मिळाली आहे.
त्याच धर्तीवर अकोला मनपाचे वेतन थकित ठेवण्याचा घाट लेखा विभागामार्फत रचल्या जात असल्याचे दिसून येत असल्याची शंका मनपा कर्मचर्यानी व्यक्त केली आहे, वेळेवर कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास गंभीर समस्या उत्पन्न होऊ शकते.कर्मचाऱ्यांचे वेतन रोखल्याने तसेच कत्राटदारांना 31 मार्च पुर्वी पैसे दिल्याने मनपा कर्मचारी पुन्हा संकटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयुक्तांनी दरमहा वेतन एक तारखेला न दिल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.यावेळी कर्मचाऱ्यांच्या समस्येवर भारतीय कामगार सेना संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.