डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी!
आता अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार!
मुंबई : अकोला लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने डॉ अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस उरले असताना काँग्रेसने अभय पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करून सरशी केली.