अखेर त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द

अखेर त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द
ग्रामपंचायत चरणगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी यांची निवड चुकीची झाली असल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
 स्थायी समतीच्या सभेत गाजला होता मुद्दा

20 मार्च 2024 झालेल्या स्थायी समिती मीटिंगमध्ये वंचित बहुजन आघाडीचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्याचे मागनी लावून धरली होती. पातुर पंचायत समिती अंतर्गत चरणगाव येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नियुक्ती त्या प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेमध्ये गेल्या तीन महिन्यापासून गाजत असताना अखेर ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पायउतार करण्यात आले. दिनांक दोन तीन 2024 रोजी च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत गटविकास अधिकारी पातूर यांना दिलेल्या पत्रानुसार ग्रामपंचायत कर्मचारी चरणगाव येथील कर्मचाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राणिम/१२१५/पत्र क्र १०९/१५/१३आ दिनांक ५/१०/२०१५ नुसार झाली नसल्याने सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करून दोषींवर काही कार्यवाही करण्याचे अशा आशयाचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी पातुर यांना दिले होते. तर नंतर दिनांक 23 3 2024 रोजी गटविकास अधिकारी पातूर यांनी ग्रामपंचायत सचिव यांना  पत्र देऊन चार प्रकारचे संदर्भ देऊन सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश चे पत्र दिले होते तर नंतर चरणगाव ग्रामपंचायतचे सचिव यांनी ग्रामपंचायत चरणगाव कर्मचारी याची निवड चुकीची झाली असल्यामुळे सदर निवड रद्द करण्याचा पत्र दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news