अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या वंचितचे तहसीलदारांना निवेदन
पातुर तालुक्यात दिनांक ०९/०४/२०२४ रोजी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारपीट व पावसामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आसमानी संकटांना पुन्हा त्याला सामोरे जावे लागत आहे सोबतच वीट भट्टी धारक हे सुद्धा रस्त्यावर आले आहेत यामध्ये अवकाळी पावसामुळे कांदा फळबाग उन्हाळी हायब्रीड पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तरी त्वरित नुकसान भरपाईसाठी पंचनामे करून त्वरित संबंधित नुकसान धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी पातुर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन पातुर तहसीलदार यांना देण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश धर्माळ महासचिव शरद सुरवाडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्जुन टप्पे राजेश महल्ले उपसभापती इमरान खान मुमताज खान हरिभाऊ इंगोले चंद्रकांत तायडे युवक अध्यक्ष तथा दिनेश गवई प्रसिद्ध प्रमुख विलास घुगे विकास कीर्तने विशाल खंडारे निखिल उपरवट अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन उपाध्यक्ष अविनाश पोहरे प्रल्हाद इंगळे निलेश सोनवणे गणेश गवई शहराध्यक्ष मोहम्मद जैद जगदीश इंगळे सय्यद जावेद मुरलीधर शिरसागर अनिकेत इंगळे प्रज्वल तायडे काशिनाथ इंगळे नीलेश सोनोने अति प्रामुख्याने उपस्थित होते