उभ्या ट्रकला दुचाकी स्वराची धडक;अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील व्यास धाब्यानजिक आयशर ट्रक व दुचाकीचा झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला, ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुर्तिजापूर येथील व्यास धाब्या नजिक घडली.
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर एक आयशर ट्रक क्रमांक MH.27 BX.8033 व्यास धाब्या नजिक असलेल्या रहदारीच्या मुख्य मार्गांवरील वळण मार्गांवर उभा असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक UK.08.AT.6659 ने ओव्हरटेक करण्याच्या नादात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने अपघात घडला या अपघातात दुचाकी स्वार सत्यप्रकाश वर्मा वय ४० राहणार पगला भारी कल्याणपुर फैजाबाद उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पथक व जय गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर,बादशहा,अमोल खंडारे,भूषण तिहले,आदित्य इंगोले घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.