काँग्रेस पक्षाच्या 25 गॅरंटी या निश्चितच जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवतील!

काँग्रेस पक्षाच्या ५ न्याय व २५ गॅरंटी या जनतेच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवतील
काँग्रेस पक्षाचे घोषणापत्र पाहता अकोल्यातील जनता कॅांग्रेस उमेदवारालाच विजयी करेल
कॅांग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी मुळे अकोल्यात कॅांग्रेस प्रणित महाविकास आघाडीचाच होईल विजय
कॅांग्रेस चे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके ह्यांची घोषणापत्रा संदर्भात पत्रकार परिषद

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस ने आपले राष्ट्रीय हमी पत्र जाहीर केले आहे. ह्या हमीपत्रामधील ५ न्याय व २५ गॅरंटी ह्यी जनतेच्या जिवनामध्ये अमुलाग्र बदल घडवतील तसेच ह्या न्याय व गॅरंटी मुळेच ह्या देशात काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडीचे सरकार येईल व अकोल्याचा खासदार महाविकास आघाडीचाच विजयी होईल असा विश्वास काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज भवन येथे काँग्रेस च्या राष्ट्रीय हमी पत्रासंदर्भात आयेजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ह्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश कॅांग्रेस चे सचिव प्रकाश तायडे, शहर जिल्हाध्यक्ष डॅा.प्रशांत वानखडे, मनपा नेते साजीदखान पठाण, महीला जिल्हाध्यक्ष पुजा काळे आदी उपस्थित होते.कॅांग्रेसच्या हमी पत्रा संदर्भात माहीती देतांना हमी पत्रा मध्ये दिलेल्या ५ न्याय व २५ गॅरंटी सविस्तर पणे सांगीतल्या ज्या मध्ये, भागीदारी न्याय,एस सी एस टी उपाययोजनेची कायदेशीर हमी,लोकसंख्येच्या हिस्सेदारीनुसार एससी, एसटी उप-अर्थसंकल्प,जल, जंगल आणि जमीन यांचे कायदेशीर हक्क वन हक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दाव्यांचे १ वर्षाच्या आत समाधान तुमची जमीन, तुमचे राज्य,जिथे एससी, एसटी हा सर्वात मोठा सामाजिक गट आहे, त्यांना अनुसूचित क्षेत्र म्हणुन घोषित केले जाईल.असे सांगण्यात आले. यावेळी शेतकरी न्याय,. आधारभूत किंमत,. कर्जमाफी आयोग,जीएसटी मुक्त शेती,कामगार न्याय,आरोग्याचा अधिकार,श्रमाचा आदर,शहरी रोजगार हमी, सामाजिक सुरक्षा, सुरक्षित रोजगार,युवा न्याय,नोकर भर्तीचा विश्वास,पहिली नोकरी निश्चित,प्रत्येक सुशिक्षित तरुणाला एक वर्षाची शिकाऊ उमेदवारीव्दारे १ लाख रुपये,पेपर फुटीपासून स्वातंत्र्य,गिग अर्थव्यवस्थेत सामाजिक सुरक्षा, युवा प्रकाश,तरुणांसाठी ५,००० कोटी रुपयांचा स्टार्ट अप फंड,महिला न्याय,महालक्ष्मी योजना,शक्तीचा आदर, अधिकार मैत्री,सावित्रीबाई फुले वसतिगृह आदींवर उहापोह करण्यात आला.ह्या ५ न्याय व २५ गॅरंटी ह्या देशातील सर्व सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेउन कॅांग्रेस पक्षाने जाहीर केल्या आहेत. कॅांग्रेस पक्ष जाहीर केलेल्या गोष्टी पुर्ण करते ह्याची प्रचीती नुकत्याच झालेल्या कर्नाटक व तेलंगणा राज्यात सरकार आल्यावर कॅांग्रेस ने घोषणापत्रातील सर्व गोष्टी पुर्ण केल्यावर आली.त्या पार्श्वभूमीवर समस्त अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सुद्धा विनंती आहे की काँग्रेसच्या या पाच न्याय व 25 गॅरंटीवर विश्वास ठेवून अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ अभय काशिनाथ पाटील यांच्या हाताचा पंजा या निशाणीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा व काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या पाच न्याय व 25 गॅरंटी या निश्चितच जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवतील याचा विश्वास यावेळी पत्रकार परिषदेत कॅांग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांनी व्यक्त केला. यावेळी विजय देशमुख, तश्वर पटेल, प्रशांत प्रधान, जयकुमार वाठुरकर,मो युसूफ, ओबीसी सेलचे कोल्हे,जया देशमुख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news