श्री. रेलेश्वर महादेव संस्थान रेल आज पार पडणार देवाधिदेव महादेव माता पार्वती विवाह सोहळा!
अकोट वऱ्हाड प्रांता मधील आदिवासी कोळी महादेव बांधवांचे आराध्य दैवत देवाधिदेव महादेव व हिमकण्या आदिशक्ती माता पार्वती यांचा लगन सोहळा आदिवासी पारंपारिक, चालीरीती नुसार अत्यंत उत्साहात व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये दि. १६ एप्रिल मंगळवार रोजी श्री. रेलेश्वर महादेव संस्थान रेल ता.अकोट या ठिकाणी संपन्न होणार आहे हा सोहळा ऐतिहासिक सोहळा ओळखल्या जातो लाखो भक्तांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडतो या विवाह सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.सुधाकरराव घुगरे अध्यक्ष, श्री.रेलेश्र्वर महादेव संस्थान रेल.यांनी केले आहे.